Showing posts with label सायकल यात्रा. Show all posts
Showing posts with label सायकल यात्रा. Show all posts

Tuesday, February 1, 2022

कोटा झालावाड सोयत - एड्स जनजागृती सायकल यात्रा 140 किमी















 



19 नोव्हेंबर 2021
आज सकाळी माहेश्वरी रिसॉर्ट हुन स्थानिक आयोजकांनी दिलेल्या पाहुणचार स्वीकारून कोटा मधून निघालो. कोटा म्हणजे प्राचीन संस्कृती, इतिहास आणि शिक्षण चा त्रिवेणी संगम.
काल एकच चुकले ते म्हणजे जी डी पटेल यांनी कोटा शहरात स्वामी नारायण टेम्पल येथे कार्यक्रम आयोजित केला होता पण तो मूळ रूट पेक्षा 10-15 किमी आत जावे लागणार होते शिवाय 3 दिवस पासून सतत 160 किमी सायकलिंग मुळे काल 145 किमी वरच ब्रेक होईल म्हणून माहेश्वरी रिसॉर्ट व स्थानिक माहेश्वरी समाज बांधवांनी दिलेले आदरातिथ्य स्वीकारले. यामुळे जी डी पटेल साहेबांचे आदरीतिथ्य स्वीकारता न आल्याबद्दल त्यांना दिलगिरी व्यक्त केली.
परभणीतील माझे मित्र डॉ व्यंकटेश पेडगावकर यांची  कन्या नेहा ही  IIT तयारी साठी  कोटा येथे शिकते. सध्या काल पाऊस खूप सुरू आहे. या पावसात रेनकोट/जॅकेट अशा 2 in 1 ची गरज होती. माझ्याकडे UK हुन आणलेले जॅकेट कामी आले परंतु पाटणकर सरांचे थंडी मुळे व पावसापासून रक्षण व्हावे म्हणून काल नेहा ला जॅकेट साठी विनंती केली असता अत्यंत योग्य वेळी नेहा पेडगावकर ने 10 किमी ऑटो ने प्रवास करून आपलूकीची भेट दिली. कोटा मध्ये परभणीची तीच आपुलकी आणि जिव्हाळा चा अनुभव आला. 8 वाजता तिचा क्लास असून देखील तिने ऑटो ने येऊन ही भेट दिली. तिचे मनःपूर्वक आभार मानून निरोप घेतला.
तत्पूर्वी कोटा मधील चंबल नदीवरील विशाल पूल ओलांडताना 'मर्दानी 2' या चित्रपटात व्हिलन चा पाठलाग करतांना अभिनेत्री राणी मुखर्जी ने याच पुलावरून उडी घेतलेला तो scene आठवला.
इथून जवळच चंबल नदीवरील नयापुरा डॅम पर्यटन साठी प्रसिद्ध आहे. वाटेत कोटा झूलॉगीकल पार्क, स्टेडियम लागले तिथून उजवीकडे वळल्यावर उजवीकडे एक किशोर सागर तलाव लागले जिथे जग मंदिर मंदिर, दर्गा आणि श्री तेजाजी महाराज आणि नाग नागीण आदी धार्मिक प्रार्थना स्थळे आहेत.
जग मंदिर महेल कोटा च्या एका राणीने 1740 मध्ये बांधले असून त्या किशोर सागर तलाव मध्ये या महेल चे सुंदर असे प्रतिबिंब दिसून येते. तसेच चंबल नदीवरील चंबल गार्डन एक छान पर्यटन स्थळ जिथे तलावात बऱ्याच मगरी दिसून येतात. तसेच देवताजी हवेली, गणेश उद्यान व सी वी गार्डन सारखी प्रसिध्द पर्यटन स्थळे आहेत.

सकाळच्या वेळी उज्जेन, इंदोर हुन येणाऱ्या ट्रॅव्हर्ल्स बस ची वाहतूक बरीच होती. याच किशोर सागर तलाव शेजारी पर्यटन साठी प्रसिद्ध असे 'सेवन वंडर्स पार्क आहे. इथे  अनेक हिंदी चित्रपटांची शूटिंग झाली आहे जसे बद्री की दुल्हानिया, मर्दानी 2 आदी.
कोटा येथे चंबल नदी च्या पूर्व किनाऱ्यावर 'सिटी फोर्ट पॅलेस' हा किल्ला प्रसिद्ध आहे जी 17 व्या शतकात बांधला होता.
तसेच राव माधो सिंह संग्रहालय जे कोटा राज्याचे प्रथम शासक राव माधो सिंह यांच्या नावावर सुरू झाले आहे. या संग्रहालयात कोटा येथील प्रसिद्ध शिल्पे, छायाचित्रे, शस्त्रे आणि राजघराण्याशी संबंधित वस्तू पाहता येतील.
पुढे पाऊस चालूच होता आम्हाला देखील अंतर जास्त असल्याने पावसात भिजत कोटा विमानतळ समोरून सायकलिंग करत कोटा शहराच्या बाहेर पडलो.
झालावाड रोड ला लागलो हा रस्ता सिमेंट रोड असून चार पदरी होता काही ठिकाणी अनंतपुर जवळ रस्त्याची कामे सुरू असल्याने सावधपणे सायकल चालवत होतो.
आज स्पीड देखील कमी आणि पावसामुळे टांगळ मंगळ होत होते. 33 किमी ला कसर या गावा जवळ नाश्ता साठी थांबलो
इथे ताडपत्री च्या शेड मध्ये  नाश्ता तर मिळाला नाही मग काय चाय, बिस्कीट और गाठी शेव पे काम चल गया.
पुढे दाराह गावात ORS ब्रेक घेऊन गावाबाहेर पडलो.
दरा जवळ 'दरा राष्ट्रीय वन्य जीव अभयारण्य' हे मगरी आणि सडपातळ तोंडाच्या मगरीसाठी खूप लोकप्रिय आहे. इथे बिबट्या, हरणेही बऱ्याच प्रमाणात आढळतात.
दरा पासून  जवळच ऐतिहासिक वास्तू 'अबली मिणी का महल' प्रसिद्ध आहे.
पुढे आम्ही सायकलिंग करत  मुकंदरा टायगर रिझर्व्ह मध्ये प्रवेश केला. इथे 2 ते 3 चढ लागले. गियर बदलत पहिल्या गियर वर पेडलिंग करत घाट चढला. चढावर एक कार आम्हाला ओव्हरटेक करून समोर थांबली. त्यांनी आमच्या मोहिमेविषयी जाणून अभिनंदन केले इतकेच नाही तर या दुर्गम घाटात पावसात भिजल्यावर अद्रक वाला चहा थर्मास मधुन ओतला. या मायेच्या आपुलकीने दिलेल्या चहाला प्रसाद समजून आम्ही ग्रहण केली. आमच्या सामाजिक विषयावर भर घाटात रस्त्याच्या कडेला गप्पा रंगात आल्या असतांना राजस्थान पोलीस देखील सामील झाले. विशेष 'वंश परंपरा' टिकविण्याच्या हव्यासापोटी स्त्रियांवर मुलगा व्हावा म्हणून लादलेले बाळंतपण आणि मुलीला दुय्यम स्थान. या परिस्थिती व मानसिकतेत आजही काहीच बदल नाही मग हरयाणा असो की राजस्थान की आपला महाराष्ट्र मानसिकता तीच.....😢
असो या सर्व भावनिक गप्पात RK जैन साहेबांनी त्या जंगलातील वाघ वाचविण्यासाठी व वन्य जीव संवर्धन साठी खूप प्रयत्न केले होते. पण काय 'शेरणी' चित्रपट प्रमाणे भ्रष्ट यंत्रणा......काय होणार.....

अरे मी चहा विषयी बोललो पण पाणी ? ते तर त्या दरोगा साहेबांनी भरून दिले. शिवाय धाब्यावर जेवणाचं सांगतो म्हणाले पण आम्ही आदराने नकार दिला. पुढे पेडलिंग करत घाट उतरून सुकेत या शहरात प्रवेश केला. इथून एकेरी वाहतूक सुरू होते शिवाय रोड चे काम सुरू असल्याने सावधपणे सायकल चालवत होतो. या रोड वर शाहबादी तसेच विविध स्टोन/मारबल चे काम करणाऱ्या बऱ्याच स्टोन इंडस्ट्रीज असल्याने खूप धुळीचे साम्राज्य होते. सर्वात महत्वाचे म्हणजे पाऊस थांबला होता. इथून एकेरी वाहतूक सुरू असल्याने अवघड जात होते पण एका मागे एक करत सायकलिंग करत
सुकेत गावा बाहेर पडलो. पुढे अहु नदी ओलांडून पुढे 2 छोटे चढ लागले आणि  मग तीव्र उतार उतरून  प्राचीन झालावाड शहरात पोहोचलो.
एका स्वीटमार्ट वर छोले भटूरे, गाजर हलवा, ढोकळा आणि लस्सी चा पोटभर आस्वाद घेऊन झालावाड शहरात भटकलो.
पुढे उजव्या बाजूला झालावाड तलाव लागला. इथे चामुंडा माता मंदिर वसले आहे. इथून 8 किमी अंतरावर काली सिंध नदीच्या व आहु नदीच्या संगमावर  प्राचीन गागरोन किल्ला प्रसिद्ध आहे. 13 व्या शतकात इथे चौहान यांचे राज्य होते.
तसेच इथे कृष्ण सागर नावाचे सरोवर प्रसिद्ध आहे ज्याच्या किनाऱ्यावर लाकडांनी बांधलेली इमारत आहे.

पुढे सायकलिंग करत ट्वीन सिटी अर्थात झालरापाटण पोहोचलो.
झलरपटन येथील सूर्य मंदिरास बाहेरून भेट दिली. वास्तुकला दृष्टिकोनातून हे सूर्य मंदिर महत्वपूर्ण असून 10 व्या शतकात मालवा च्या परमार वंशीय राज्याने याचे निर्माण केले होते. मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान विष्णू अर्थात पद्मनाभस्वामी ची मूर्ती विराजमान आहे. या मंदिराची बनावट कोणार्क च्या सूर्य मंदिर प्रमाणे आहे असे मानले जाते.
चला आजचा मुक्काम आणखी 40 किमी दूर असल्याने आम्ही उज्जेन हायवे ने सोयत कडे निघालो.

सोयत रोड ला तलाव, कॅनॉल पाण्याने भरून वाहत होते. गव्हाचे शेत बहरलेले होते. सिंगल रस्ता असून देखील वाहतूक कमी असल्याने पेडलिंग मजेत सुरू होती. रायपूर ला चहाचा आस्वाद घेऊन सुवास गाव ओलांडल्यावर मध्य प्रदेश बॉर्डर मध्ये प्रवेश केला.
पुढे सोयत येथे जैन लॉज मध्ये केवळ 300 रुपयात मिळाली. चला विद्यार्थी आहे म्हटल्यावर खोली स्वस्तात मिळाली. मोहिमेच्या 8 व्या मुक्कामी 1160 किमी सायकलिंग करून मध्य प्रदेश राज्यात दाखल झालो.

डॉ पवन चांडक

Saturday, January 29, 2022

शाहपुर जयपूर निवाई टोंक 160 किमी एड्स जनजागृती सायकल यात्रा

 


















17 November 2021 


डोंगराळ भाग असल्याने शिवाय गावाबाहेर हे लॉज असल्याने रात्रभर थंडी जाणवत होती. तरी पहाटे 5:30 ला उठून आवरून  17 नोव्हेंबर च्या सकाळी 06:30 वाजता निघालो, वातावरण ढगाळ असल्याने सूर्यनारायण चे दर्शन झाले नाही.  सकाळी 18-19 ची स्पीड ठेवत मनोहरपूर येथे एका टपरीवर वाफाळलेला चहा आणि सोबत पारले जी  बिस्कीट घेऊन निघालो. येथील रस्ते पूर्णपणे फ्लॅट नसून बरेच चढ उतार होते. पुढे 35 किमी नंतर  चांदवाजी गावा जवळ एक रस्ता जयपूर बायपास ला जाणारा पण आम्ही जयपूर कडे जाणारा रिंग रोड ने निघालो. हा सिंगल रोड होता पण वाटेत दुतर्फा शेत, रस्त्याच्या उजव्या बाजूला छोट्या टेकड्या, वाटेत शाळेला जाणारी मुले आम्हाला टाटा म्हणत हात दाखवत होती. थोडं पुढे आल्यावर कोणी तरी आवाज दिलं पाहतो काय तर सायकल च्या कॅरियर वर रात्री न वाळलेले कपडे पडले होते. पुन्हा थोडं मागे जाऊन उचलून व्यवस्थित बांधून निघालो. या भागात शाळा सुरू झाल्या असल्याने शाळकरी मुलांची वर्दळ होती आणि हायवे पेक्षा हा रस्ता कमी रहदारीचा होता.  अचरोल नंतर छोटेसे जंगल लागले या जंगल वाटेतून सायकलिंग करायला मजा येत होती. 08:30 नंतर सूर्य हळूहळू वर आल्याने त्याच्या प्रकाशाने टेकडी, टेकडी खालच्या वस्ती व शेतं प्रकाशात न्हाऊन निघाली. आता वातावरण मस्त असल्याने सायकलिंग ला मजा येत होती. पण चढ उतार असल्याने वारंवार गियर बदलावे लागत होते.  लाबना गाव ओलांडत रस्त्याच्या दुतर्फा एका पेक्ष्या एक भारी असे राजवाड्या सारखे हॉटेल व रिसॉर्ट आणि त्याचे वैभव बाहेरूनच पाहत आम्ही पुढे जात होतो. पुढे एक छोटासा चढ लागला व छोटेसे जंगल ज्याला नाहरगढ फॉरेस्ट म्हणतात तिथून पुन्हा उतार लागला. इथे नाहरगढ बायोलॉजिकल पार्क व इथून आमेर जवळ एलिफंटास्टिक एलेफँट वाईल्ड लाईफ संच्युरी प्रसिद्ध आहे. आमचे अंतर बरेच असल्याने आम्ही त्या सफारी ला प्रत्यक्ष भेट देऊ शकलो नाही. पुढे आमेर गाव लागले. इथे  अंबर फोर्ट म्हणून प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. जवळच जयपूर येथील प्रसिद्ध जल महल आहे. जे  मान सागर तलाव मध्ये वसले आहे. आम्ही त्या झिल जवळून सायकलिंग करत पुराणी चुंगी सर्कल पार्क मार्गे जयपूर शहर  उजव्या बाजूला ठेवत निघालो. मागील अर्धा तास पासून भूक लागली होती परंतु योग्य हॉटेल न मिळाल्याने छिड छिड होत होती. अखेर एका गाड्यावर ढोकळा, कचोरी व दाल का शीरा चा पोटभर आस्वाद घेतला. भूक इतकी लागली होती की किती प्लेट खाल्ले की कळलेच नाही. पुढे सुंदर जयपूर शहरातून मार्ग काढत रिंग रोड ने सुराजपोल अनाज मंडी जवळून, उर्मिला उद्यान मार्गे वाटेत जियोलॉगिकल सर्व्हे ऑफ इंडिया ची इमारत लागली ती बाहेरून पाहत आम्ही  सितापुरा, प्रल्हादपुरा भागातून जयपूर रिंग रोड ओलांडून टोंक कोटा हायवे कडे निघालो. 

वाटेत 12 वाजता मालवा गावाजवळ एका पेट्रोल पंप जवळ थोडी रिफ्रेशमेन्ट घेऊन हायवेला लागलो. या रस्त्यावर फारच तुरळक वाहतूक होती. पण अनेक ठिकाणी दारूची दुकाने दिसत होती. राजस्थान मध्ये प्रामुख्याने गहू, बाजरी, ज्वारी, मका आदी रब्बी पिके प्रामुख्याने घेतली जातात. हायवेच्या दुतर्फा बाजरी, गव्हाची पिके जास्त करून दिसत होती. 

पुढे चाकसू च्या पुढे आल्यावर भूक लागली होती. शिवाय आज बरंच ऊन जाणवत होतं. आज जेवणाच्या बाबतीत देखील सकाळ प्रमाणे  गणित चुकले होते.  पण योग्य ढाबा मिळत नव्हता सारखी भुकेने आमच्या जीवाची तगमग होत होती. 2 ठिकाणी विचारले तर निव्वळ बार होते आणि स्नॅक्स पण आम्हाला राजस्थानी ढाबा जिथे चांगले शाकाहारी जेवण मिळेल ते आम्ही पाहत होतो. अशा परिस्थितीत पाटणकर सर अत्यंत संयम राखून होते. काय करणार या शोध मोहिमेत सायकलवरच आम्ही चिक्की खात 3 ते 4 उड्डाणपूल ओलांडून आणखी 13 किमी पुढे आलो. अखेर कोठून या गावा जवळ एक ढाबा सापडला. जवळपास 120 किमी नंतर लंच साठी  थांबलो. त्याला जेवण ऑर्डर केल्यावर त्याने लाल लाल अशी तर्री असलेली तिखट गट्याची भाजी आणि चपाती पण सोबत ताक मिळाल्याने अखेर कसे बसे जेवलो. 

पण इथे बरेच ट्रक ड्रायव्हर्स सोबत एड्स जनजागृती सायकल मोहीम पुढील रूट, चढ उतार विषयी चर्चा झाली. त्यांना सुरक्षित लैंगिक संबंध विषयी माहिती दिली. व एड्स चा प्रसार कारणे, उपचार आदीविषयी माहिती दिली. 

त्यात पाटणकर सरांनी त्याला कुतुहुल म्हणून कोटा नंतर घाट व रस्ता कसा आहे, चढ किती आहे आदी  विचारपूस केली. 

बाज वरच स्वतःला झोकून थोडा आराम करून आम्ही निघालो.  पुढे गुंन्सी ओलांडून निवाई बायपास ओलांडल्यावर टोंक 17 किमी बाकी होते. आणि अचानक सायकलचे चाक डुग डुग करायला लागले. आयला आता काही खरे नाही म्हणत मी सायकल बाजूला घेतली तर पाहतो काय " अरे रामा रामा पंचर ते पण नवीन ralson चे टायर व केंदा चे ट्यूब असून देखील  सायकल पंचर झाली. पंचर होणे काही नवीन अर्थात फार मोठी गोष्ट नाही पण इथे मी गोंधळून थोडी गडबड केली. पण इथे गुरू से शिष्य सकारात्मक चा अनुभव आला.  मागील टायर पंचर झाल्यावर मी उगाच चिडचिड केली ज्यामुळे 10 मिनिटं ऐवजी घाई केल्याने चाक खोलून ट्यूब बसवताना कधी नट विसर तर कधी वॉल ज्यामुळे अधिक वेळ लागत होता आणि उगाच चिडचिड करत होतो ज्यामुळे जोडायला 20 मिनिटे लागली. पण या वेळी पाटणकर सरांनी धीराने, शांतपणे पंचर जोडायचा मंत्र दिला. अर्थात इतका अनुभव असून आज शिष्य पाटणकर सरांचे बोल कामी आले. 

 पुन्हा नव्या दमाने सायकल हायवेला लागली. 

भौगोलिक दृष्ट्या देखील ही राईड नवीन अनुभव देतेय जसे पहिले 2 दिवस एक दम फ्लॅट तर दिल्लीत flyover, ट्रॅफिक तर जयपूर जवळ चढ उताराचे रिंग रोड, ट्रॅफिक, भर दुपारी हेड विंड चा सामना करत आजच्या राईड चा आनंद आम्ही घेतला.


पुढे एक चढ चढून आम्हाला बनस नदी लागली. पुढे बनस नदीवरील पूल ओलांडून टोंक शहरात प्रवेश केला. वाटेत एक बाईक वाल्याने काही अडचण भासल्यास नंबर दिला. तितक्यात कोटा येथील जी डी पटेल यांचा फोन की टोंक येथे अग्रवाल धर्मशाळा येथे श्री नरेंद्र विजय यांनी व्यवस्था केल्याचे सांगितले.  

अब सब अच्छा होगा म्हणत पंचर मुळे आलेली निराशा दूर होत गेली.  टोंक येथील भव्य कामानीने आमचे स्वागत केले. शहरात अनेक युवक आमच्या सायकल वरील बोर्ड वाचत आमच्या मोहिमेविषयी कुतूहल व्यक्त करत सेल्फी घेत होते. अखेर अग्रवाल धर्मशाळेत पोहोचलो. तिथे नरेंद्र विजय यांनी धर्मशाळेत येऊन आमची भेट घेऊन रात्रीच्या जेवणाची व रात्रीच्या मुक्कामाची सोय देखील केली होती.त्यांचे आभार मानून आम्ही स्नान वगैरे आटोपून आलेल्या टिफिन मधून पोटभर जेवलो. रूम अत्यंत साधी होती शिवाय थंडी बरीच होती आणि टॉयलेट बाथरूम देखील लांब होते. धर्मशाळेत उतरलेल्या बऱ्याच प्रवाशांनी  आमच्या मोहिमेविषयी जाणून घेऊन शुभेच्छा दिल्या. आज बराच थकल्याने आणखी काही लिहू शकलो नाही पण उद्याची व्यवस्था संदर्भात पुण्यातील उद्योगपती लाहोटी अंकल चा फोन की कोटा येथे माहेश्वरी रिसॉर्ट मध्ये तुमची उद्याची व्यवस्था केली आहे. चला कल अच्छा होगा म्हणत झोपी गेलो. 


डॉ पवन चांडक 

Monday, January 24, 2022

वाघा आटारी बॉर्डर - अमृतसर - जालंधर - फगवाडा एड्स जनजागृती सायकल यात्रा - १३० किमी




























एड्स जनजागृती सायकल यात्रा : वाघा आटारी बॉर्डर - अमृतसर - जालंधर - फगवाडा १३० किमी

 

12 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता छेहारता गुरुद्वारा चे दर्शन घेऊन चहा ब्रेड चा प्रसाद घेऊन गोल्डन टेम्पल ला पोहोचलो.

१६ व्या शतकापासून अमृतसर हे शीख समुदायाचे मुख्य धार्मिक स्थान राहिले आहे. येथील सुवर्णमंदिर हे 'अमृत तलावा'च्या काठी आहे. हरमंदिर साहेब, दरबार साहेब, हरिमंदिर . नावांनीही त्याचा उल्लेख होतो. शिखांचा पवित्र ग्रंथगुरु ग्रंथसाहिब’ पहिल्यांदा या मंदिरात ठेवला गेला. त्यामुळे या मंदिराला शीख धर्मपीठाचे महत्त्व प्राप्त झाले.

अर्जुनदेव यांनी १५८८१६०७ दरम्यान त्याचे बांधकाम पूर्ण केले. त्याचा अभिकल्प अर्जुनदेव यांनी शीख धर्मातील प्रतीके संकल्पना यांनी परिपूर्ण बनविला. त्याची वास्तू चौरस असून सांडवा किंवा साकवावरुन मंदिरात प्रवेश करावा लागतो. मूळ वास्तू दुमजली त्यावर घुमट असावा. तिचे मातीच्या विटेचे बांधकाम सुबक होते. मंदिराच्या उभारणीत भव्यतेपेक्षा साधेपणावर विशेष भर दिला आहे. मंदिराला चारही बाजूंनी प्रवेशद्वारे असून सर्व जाति-धर्मांच्या स्त्री-पुरुषांना ते खुले आहे. येथील तलावालाअमृत सरोवरआणि त्या भोवतीच्या शहराला अमृतसर म्हणतात. अमृतसर अर्जुनदेवांनी वसविले.

सुवर्ण मंदिर येथे पोहोचून सूर्याच्या पहिल्या किरण सोबत लाईन मध्ये लागून दर्शन घेतले. अत्यंत शिस्तीत लाईन मध्ये लागून गुरुग्रंथ साहेब पुढे डोके टेकवून सायकल मोहिमेच्या यशासाठी सुरक्षित प्रवासासाठी आशीर्वाद घेऊन लंगर प्रसाद घेऊन आम्ही रेल्वे स्टेशन पोहोचलो. स्टेशनवर डॉ पी एस रानु यांनी आमचे स्वागत केले. डॉ रानु हे एके काळी पंजाब होमिओपॅथिक परिषद चे अध्यक्ष होते केंद्रीय होमिओपॅथिक परिषद चे सदस्य तर सध्या सहस्त्रधारी शीख पार्टीचे अध्यक्ष आहेत. शिवाय त्यांना पंजाब पोलिस ची विशेष सुरक्षा आहे. आमच्या सायकल 9 वाजता मिळाल्या. सुदैवाने रेल्वेचे आभार मानायला पाहिजे. कारण त्या व्यवस्थित पोहोचल्या होत्या. कागदोपत्री फॉर्मलीटी आटोपून आम्ही वाघा अट्टारी बॉर्डर पोहोचलो. तर पाहतो काय, बॉर्डर चेक पोस्ट वर डॉ रानु यांनी आमच्या फ्लॅग ऑफ ची तयारी केली होती. पहिल्यांदा भारत पाकिस्तान बॉर्डर जवळून पाहण्याचे स्वप्न साकार झाले. कळत नकळत हे दृश्य पाहून मनात रोमा रोमात भारत माता की जय, वंदे मातरम आदी जय घोषाने वातावरण देशभक्तीमय झाले होते. तिथे बरेच पर्यटक, महाराष्ट्रातील पर्यटक येऊन आम्हास शुभेच्छा देत होते. अनेक पत्रकार हिंदी, पंजाबीत आम्हाला प्रश्न विचारून मुलाखत घेत होते.

उद्देश एकचआझादी का अमृतमहोत्सवी’ वर्ष निमित्त सर्वसामान्य नागरिकांमध्ये एचआयव्ही एड्स जनजागृती, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्टॉप ड्रग, नशा विरोधी आदी संवादातून जनजागृती आजवर एचआयव्ही ग्रस्त या अनाथ बालकांच्या मूलभूत प्रश्नावर सुरू असलेले कार्य सायकल मोहीम च्या उद्देश मार्ग विषयी संवाद साधत होते. 11 वाजले आणि अखेर ती वेळ आली. बी एस एफ चे कमाडींग ऑफिसर नायर यांनी आमच्या सायकल मोहिमेस हिरवा झेंडा फडकावून शुभेच्छा दिल्या.

जो बोले सो निहाल सश्रीयकाल

भारत माता की जय

वंदे मातरम आदी जयघोषाने आमच्या सायकल मोहिमेची सुरवात झाली.

ग्रँड ट्रंक रोड वरून मी आणि पाटणकर सर मस्त पेडल मारत सकाळची थंडी आता बरीच कमी झाल्याने स्वेटर्स उतरवून आम्ही टी शर्टवर निघालो.

या वेळी मला बॉलिवूड मधील गाणे सुचले

 

अरे शान्ति मार रहा संसार

अब तू आने दे ललकार

तेरी तो बाहें पतवार

कदम हैं तेरे हाहाकार

तेरी नस नस लोहा तर

तू है आग मिल्खा

रे बस तू भाग मिल्खा।।

दोन्ही बाजूला गहू, मक्का ने बहरलेली शेते आणि वाहणारा मंद आणि गार वाऱ्याचा आस्वाद घेत मध्येच चुकीच्या बाजूने येणारे वाहन ट्रॅक्टर चुकवत आम्ही गोल्डन गेट अमृतसर पोहोचलो. इथून जालंधर कडे जाण्यासाठी एक बायपास जातो तर दुसरा अमृतसर शहरातून पण आम्ही लोकांशी संवाद साधता यावा म्हणून अमृतसर शहरातून निघालो. रस्ता मोठा होता तरी ट्रॅफिक खूप असल्याने मी आणि पाटणकर सर अत्यंत सावधपणे सायकल चालवत अमृतसर शहर पाहत सायकलिंग करत निघालो. आमच्या सायकल हँडल वरील फडकणारा तिरंगा आणि एड्स जनजागृती बोर्ड मुळे ठिक ठिकाणी लोक थांबून आमच्या सायकल मोहीम उद्देश विषयी विचारपूस करून शुभेच्छा देत होते. पंजाबी वयोवृद्ध लोक डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत होते. वाटेत खालसा कॉलेज समोर अनेक विद्यार्थी मित्रांनी आमच्या सायकल सोबत सेल्फी घेतल्या. अमृतसर बस अड्डा हुन उड्डाण पूल चढत आम्ही मेन रोड पकडला. या रस्त्यावर सुसाट वेगाने वाहने वाहत होती. अखेर 1 तास ट्रॅफिक मधून मार्ग काढल्यावर अमृतसर शहराच्या बाहेर पडलो. भूक लागली होती. रस्त्यावर थोडी केळी विकत घेऊन नाश्ता केला. इथून जालंधर हायवे रस्त्याने निघालो. तितक्यात डॉ रानु सरांचा फोन की पुढीलमनवाला’ गावा जवळ एक टोल प्लाझा नंतरTake Away’ Restaurant लागेल. तिथे डॉ अनुविंदर कौर रंधवा ते काम करत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र तर्फे आपला सत्कार ठेवला आहे. आम्ही अर्धा तास नंतर तिथे पोहोचलो. त्या PHC तील कर्मचारी मित्रांनी आमचे आदरातिथ्य करून आम्हाला पोटभर जेऊ घातले. वाटेत एकपरम’ नावाचा पत्रकार मित्र भेटला. त्याने आमच्या संपूर्ण सायकल मोहीम विषयी एका पंजाबी चॅनल साठी मुलाखत घेतली. दुपारचे 1 वाजले होते. आम्ही वेळ घालवता पुढे निघालो. जवळपास 15 किमी पुढे आलो नसेल तर तितक्यातधडाम’ असा स्फोट सारखा आवाज झाला. तर पाहतो काय ? आमच्या पाठी मागे असलेल्या ट्रक चे समोरचे टायर फुटून त्याचे अवशेष माझ्या सायकलच्या ही पुढे उडून पडले होते. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही तो ट्रक जागेवरच थांबला………

पण काही मिनिटे आमच्या छातीत धडधड होऊ लागली. थोडे पाणी पिऊन आम्ही निघालो.

वाटेतबियास नदी’ ओलांडून ब्यास शहर च्या थोड्या पुढे आलो.

बियास ही उत्तर भारतामधील प्रमुख नदी आहे. बियास (व्यास) नदी हिमाचल प्रदेशाच्या कुलु जिल्ह्यात उगम पावते सुमारे ४७० किमी वाहत जाऊन पंजाब राज्यात सतलज नदीला मिळते.

‘राव्या’ गावाच्या थोडे पुढे आल्यावरब्यास नदी’ वरील विशाल पूल ओलांडून आम्हीसंग्रावन’ शहर ओलांडले.

पुढे वाटेत कर्तारपूर येथीलजंग आझादी’ मेमोरियल लागले.

पुढे कर्तारपूर जवळ एका उड्डाणपूल वर डॉ रानु त्या गावातील शेतकरी आमच्या स्वागत साठी उभे होते.

त्यांनी स्वागत करून एका प्लेट मध्ये आमचे जेवण वाढले. हायवेला कडेला फुटपाथ वर उभे राहून आम्ही पुलाव, चपाती, दाल मखणी आणि सलाड आदी पोटभर जेवण जेवलो. ते जेवण खूपच रुचकर होते. कदाचित त्यांचे प्रेमच इतके होते की साधे जेवण देखील पंच पक्वान्न पेक्ष्या देखील गोड लागत होते.

तितक्यातजालंधर पोलीस’ ची गाडी आली. आम्हाला वाटले काय झाले की ? आम्ही काय केले ?

की हे पोलीस अचानक समोर येऊन उभे राहिले ?

मग त्या पोलीस इन्स्पेक्टर ने पुष्पगुच्छ देऊन आमचे स्वागत केले. तो म्हणाला तुमचा इमेल DIG साहेबांना मिळाल्यावर त्यांनी आम्हाला तुमच्या स्वागत साठी सांगितले होते. चला प्रशासन इमेलची दखल घेतात……

सायंकाळ चे 4:45 वाजले होते. आता वेळ घालवता आम्ही निघालो. सकाळ पासून 80 किमी झाले होते. पुढे जालंधर बायपास जवळबिधीपूर’ येथेडॉ ललित ओम’ डॉ रश्मी घई’ यांचे हॉस्पिटल होते. ते त्या पंचक्रोशीतील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. डॉ ललित होमिओपॅथिक डॉक्टर तर त्यांच्या पत्नी डॉ रश्मी ह्या आयुर्वेदिक डॉक्टर. डॉ रानु डॉ ललित कॉलेजमध्ये एकमेकांचे वर्गमित्र होते. आजही त्यांची मैत्री कायम आहे. त्याच्या हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ ने आमचे स्वागत केले. डॉ रश्मी यांनी प्रेमाने त्यांच्या हाताने बनवलेलेपनीर पकोडे’ गरम समोसे’ खाऊ घातले. आपल्या देशातील पण इतक्या लांबच्या अनोळखी राज्यात अस्सल पंजाबी पाहुणचार पाहून आम्ही भारावून गेलो. डॉ रश्मी यांना आमच्या कार्याविषयी सायकल मोहिमेविषयी बरेच जाणून घ्यायची इच्छा असल्याने, त्यांच्याशी सायकलिंगची आवड, एड्स जनजागृती पुनर्वसनविषयक कार्य आदीविषयी माहिती दिली. त्यांनी उद्या त्यांचे वडील ज्यांना वयाच्या 80 व्या वर्षी  देखील सायकलिंग ची आवड असून ते विख्यात गणित तज्ञ असून त्यांनाराजपुरा’ येथे भेटण्यासाठी विनंती केली. सायंकाळी 6 वाजले उशीर होत असल्याने त्यांचा निरोप घेऊन निघालो. जालंधर ऐवजी थोडे पुढे मुक्काम करावे म्हणून आम्ही जालंधर बायपास ने निघालो.

जालंधर हे सर्वात जुने शहर एक मोठे औद्योगिक शहर असून येथील मुख्य उत्पादने चामडे, खेळ हाताची साधने आहेत. जालंधरमध्ये बरीच मंदिरे, गुरुद्वार, किल्ले आणि संग्रहालये आहेत.

नाथ इतिहास संदर्भ: भारतात नाथांच्या नावाने बरीच तीर्थक्षेत्र आहेत. जालंधर जिल्ह्याचे नाव भगवान आदिनाथ यानिकी शिव यांचे शिष्य जालंधर नाथ यांच्या नावावर आहे. काही जणांचा असा विश्वास आहे कीजालंधर’ म्हणजे पाण्याखाली आणि येथे सतलज आणि बियास नद्यांचा संगम आहे, म्हणून त्या जागेला जालंधर असे नाव देण्यात आले.

 

अंधार लवकरच पडला होता. 06:30 वाजता पाटणकर सरांचा सायकलचा लाईट डिस्चार्ज झाल्याने पुढे कसे जायची चिंता होती. शिवाय 100 किमी सकाळपासून झाले होते. मग मी त्यांना दिलासा देऊन one by one एका मागे एक निघालो. वाटेत बरेच junction होते जसे एक पठाणकोट, जम्मू कडे तर उजव्या बाजूला विशाल पसरलेले जालंधर शहर. बरेच मोठे शहर असून वाटेत बरेच मोठे मोठे हॉटेल, मंगल कार्यालय, गुरुद्वारा, मंदिर पाहत आम्ही सांभाळून सायकल चालवत होतो. कारणनजर हटी दुर्घटना घटी’ कारण लेन कटिंग वर इंडिकेटर दाखवायची शिस्तच नव्हती. त्यामुळे जीव मुठीत घेऊन सायकल चालवत होतो.

जालंधर मागे सोडून आम्ही फगवाडा कडे निघालो. 8 वाजताच्या आसपास लायटिंग ने चमकत असलेले फगवाडा शहर लागले. जवळपास सकाळपासून 11 वाजता निघालेलो आम्ही अमृतसर, जालंधर हे जिल्हे ओलांडून 130 किमी सायकलिंग करून फगवाडा पोहोचलो. तितक्यात डॉ मिट्टू गोयल यांचा फोन आला की, हनुमान मंदिर येथे तुमची राहण्याची सोय केली आहे. पुढे उड्डाणपूल जवळ डॉ मिट्टू उभे होते. ते हनुमान मंदिर येथे घेऊन गेले आमच्या राहण्यासाठी छान खोलीत आमची सोय करून मार्केट रोड वर एकाठेला’ वरराजमा चावल तंदूर रोटी’चे जेवण जेऊ घातले. त्या रुचकर जेवणावर मी आणि पाटणकर सरांनी मिटक्या मारत आस्वाद घेऊन डॉ मिट्टू सरांच्या आदरातिथ्य बद्दल आभार मानून निरोप घेऊन झोपी गेलो.

उद्या 13 नोव्हेंबर चा फगवाडा लुधियाना - अंबाला 165 किमी अनुभव शेअर करेल