Saturday, April 23, 2022

आंजर्ले बीच - मुरुड बीच - लाडघर बीच - दाभोळ - गुहाघर - जयगड - गणपती पुळे















































 

Konkan Day III: आंजर्ले बीच - मुरुड बीच - लाडघर बीच - दाभोळ - गुहाघर - जयगड - गणपती पुळे

 

सकाळी वाजता सर्व उठून : १५ पर्यंत तयार होऊन पोटात चहा बिस्किटे रिचवत :३० ला बाहेर पडलो. सुंदर असेआंजर्लेबीचवर ३० मिनिटे थांबून वाजता हर्णै गावा कडे निघालो. वाटेत आंजर्ले गावातील किमीचा उंच चढ चढून मुरडी मार्गे निघालो. तर पुन्हा - किमीचा उंच वळणाचा घाट चढून एका  टेकडीवर पोहोचलो . त्या टेकडीवरून पाहतो तर काय ? अथांग सागर, हर्णै गाव, एकीकडे खोल दरी, तर एकी कडे दाट धुक्यातून सह्याद्रीच्या डोंगर रंग दिसत होत्या सुंदर असा सूर्योदय पाहून आम्ही तर जाम खुश झालोअसे वाटले कि काल रात्री इथेच तंबू लावला असता तर ?

 

लगेच आम्ही जसे काय पृथ्वी वरील स्वर्गावर आल्या सारखे आनंदी होऊन फोटो सेशन चालू केले. जवळपास ३०-४० मिनिटाच्या फोटो सेशन नंतर आम्ही पुढेमुरुड बीचकडे निघालो. पुढे  किमीचा उतार उतरून स्वतःच्या सायकलच्या वेगावर नियंत्रण ठेवतपालंडेचा उतार उतरून समुद्राजवळून जात सुंदर रेसोर्ट्स पाहतमुरुड बीचकडे वळलो. मुरुड समुद्रकिनार्यावरून आम्ही आमच्या सायकली समुद्राच्या वाळूवरून nonstop km चालवत पाण्यातून, खडकावरून चालवत, पाणी उडवत, बीच वरील पर्यटकांना लोकांना एड्स विषयी जनजागृती करत लाडघरच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहचलो. रवी राजेश इथे मागे पडले होते. पुनः किमीचा चढ चढून बुरांडी गावात रवी, राजेश साठी थांबलो. पण त्यांना वेळ होता. म्हणून आम्ही दोघांनी सकाळचावडा पावनाश्ता करून दोघेच पुढे निघालो. पुन्हा किमी चा उंच चढ, वळणदार घाट चढत वर आल्यावर आम्हाला पृथ्वी वर उभा असलेल्या भगवानपरशुरामाने’ (मूर्ती) ने दर्शन दिले. आम्ही पण त्यांच्या सोबत छायाचित्र काढून घेतले . ‘दाभोळला जाणारा रस्ता हा उंच डोंगर रांगामधून, जंगलातून जात होता. आम्ही देखील जोमाने सायकल चालवत होतो. पुढे उंचावर आल्यावर आम्हाला पलीकडच्या डोंगरावर दाभोळ औष्णिक वीज प्रकल्प दिसला. ‘काजूवाडीजवळमुकेशथकल्यासारखा वाटत होता. आम्ही लगेचमाझाशीत पेय पिउन चार्ज झालो - किमीचा धोकादायक उतार सावधपणे उतरतदाभोळ जेट्टीला पोहोंचलो. तिथे पाणी, कोकम शरबत घेई पर्यंत आमची बोट सुटली पण हि संधी आम्ही वाया घालवता तेथील आमच्या एड्स जनजागृती सायकल मोहीम विषयी चर्चा केली. काही वेळानी बोट आल्यावर सायकल माणसांचे ५० रुपये देऊन आम्ही समुद्र ओलांडूनधोपावेजेट्टीला पोहोंचलो.

 

गुहागरचा रस्ता विचारात पुनः - किमीचा चढ चढून आम्ही गुहागर कडे एन्रॉन च्या सीमेंट काँक्रीटच्या जंगलातून जातांना घामाने ओले झालो होतो. लगेच घोट घोट पाणी पिट अक्खी लिटर ची बॉटल संपवूनदाभोळ औष्णिक वीज प्रकल्पसमोरून जातांना पर्यावरणाला पोहोचवणाऱ्या शासनाच्या औद्योगीकरणाच्या धोरणाच्या नावाने शिव्या हासडत शेवटीगुहागरपोहोंचलो. दुपारचे वाजले होते. पोळी भाजीचे जेवण करूनहेडवीचा रस्ता विचारात किमीचा चढ चढूनचिपळूणनाक्यावर आलो. वारंवार मुकेश मागे पडत होता. मी त्याची वाट पाहत थांबत होतो. मुकेशने थकल्याचे दमल्याचे सांगितले म्हणून आम्ही हळू हळू पुढे निघालो. ‘हेडवीचा किमीचा चढ चढून पुनः किमीचा उतार उतरूनहेडवीगावात आल्या आल्या मुकेशला पायात cramp आल्याने आम्ही थांबलोमुकेशला त्याचा अति आत्मविश्वास महागात पडला. त्यालाव्हिटॅमिन ’, ‘ग्लुकोजदेऊन मग चहा बिस्कीट खाऊ घातले. ‘हेडवीच्या गणपती मंदिरात विश्रांतीचा सल्ला दिला. पुनः किमीचा चढ चढून मंदिर परिसरात पोहोचलो. हेडवी येथील प्राचीन गणपती मंदिराचे दर्शन घेतले तोपर्यंत मुकेश आराम मिळाल्याने हायड्रेशन मुळे फ्रेश झाला.

हेडवीतेतवसालजेट्टी २८ किमीचे अंतर आम्ही थोडा चढ , मग पठार मगरोहिलेबंदराजवळून जात किमीचा उतार उतरून वाजतातावसालपोहोंचलो. आम्ही दोघांनी वडा पाव, कोकम शरबत घेऊन फ्रेश झालो. आम्ही दोघे जे सकाळपासूनआंजर्ले ते तावसाल१०५ किमी दरम्यान सायकल चालवत होतो तर वेळो वेळो तेच तेच पर्यटक आम्हाला भेटत होतेत्यांनी आमच्या सायकलची गती stamina बद्दल आश्चर्य व्यक्त केले. कारण ते तरतवेरा’, ‘इनोवासारख्या वाहनामध्ये आम्हीसायकलवरहे कोंकण पाहत जनजागृती करत होतो.

 

सायंकाळी :३० वाजता किनाऱ्याला बोट लागली. आम्ही देखील मस्त पणे मावळत्या सूर्याचा अर्थात सुर्यास्ताचा आनंद घेत वाजता  बोटनेजयगड जेट्टीलापोहोंचलो. लगेच किमीचा कठीण चढ चढून स्फूर्तीनेगणपती पुळेकडे निघालो. जे कि, केवळ २४ किमी बाकी होतेमस्त थोडे फार चढ उतार वेगाने उतरत शर्यत लागल्यासारखे वेगाने सायकल चालवू लागलो. कारण आम्हाला काही तरी जिंकल्याचा आनंद होत होता. चढ, घाट, दरी, डोंगर, दमा, थकवा नावाची भीती यावर विजय मिळवल्याचा १३० किमी अंतर २० चढ एका दिवसात पूर्ण केल्याचा आनंद होत होता. संध्याकाळच्या वेळीनांदिवडे’, ‘मालगुंडच्या समुद्रकिनाऱ्याजवळून आम्ही सायकल चालवत वाजतागणपती पुळेपोंहचलो. तिथे केवळ २०० रुपयात चांगली सुविधायुक्त खोली मिळाली.

फ्रेश होऊन गणरायाचे दर्शन घेतले. पोटभर जेऊन उद्यापावसपर्यंत जायचा plan करून झोपलो.

रवी राजेश हे आमच्या २५ किमी मागेतावसालयेथे मुक्कामाला थांबले होते.


No comments: