Showing posts with label cycling. Show all posts
Showing posts with label cycling. Show all posts

Sunday, April 24, 2022

Scotland Cycling - फोर्ट विलियम ग्लेन नेविस जंगल सायकल भ्रमंती

 

Day 5: 1 April 2019: फोर्ट विलियम ग्लेन नेविस जंगल सायकल भ्रमंती

 

सकाळी वेळेवर फ्रेश होऊन बॅग पॅक करून सायकलवर वेळेवर लिनलिथगो स्टेशन पोहोचलो. शीतल सुनबाईने 2 दिवस पुरतील इतके पराठे आलू भाजी सोबत दिली होती. रिटर्न तिकीट घेऊन ट्रेन मध्ये चढलो. सुरवातीला लिनलिथगो ते ग्लाससगो असा प्रवास त्यात सायकलला देखील सीट मिळाली. पुढे ग्लासगो हुन मलाई ट्रेनमध्ये 4 नं प्लॅटफॉर्म वर चढलो. तर इथे सायकलला लटकविण्यासाठी स्पेशल रॅक ज्यात सायकल उलटी उभी करून  मागचे चाक हुकला अडकवतात आणि मग स्ट्रॅप ने बांधतात. आरक्षित सीटवर ग्लासगो फोर्ट विलियम प्रवास सुरु तासानंतर खिडकीतून अत्यंत निसर्गरम्य दृश्याचे दर्शन  दोन्ही बाजूला पर्वतरांगा त्यातून डाव्या बाजूला नदी, उजव्या बाजूला डोंगर आणि मधून डोंगरातील चढ उतारावर धावणारी आमची ट्रेन. हे सर्व दृश्य कोंकण रेल्वेचे आठवण करून देत होते. वाटेत विविध स्टेशन्स बाजूला सुंदर कॉटेजेस आणि माझ्या सारखे भटके सायकलिस्ट, हाईकर्स. या भागात भटकणाऱ्या लोकांना वयाची मर्यादा नसते लहान असो की मोठा, वयोवृद्ध लोक देखिल पाठीवर बॅकपॅक, हायकिंग स्टिक किंवा माऊंटेन बाईक सायकल घेऊन निघतात. दुपारी 12:15 वाजता फोर्ट विलियम स्टेशन वर पोहोचुन सायकल घेऊन स्टेशन बाहेर आलो तर पावसाने आमचे स्वागत केले. तसेच भिजत सिटी सेंटर मधील ऐतिहासिक चौक, चर्च, मोनूमेन्ट पहात ग्लासगो एव्हरनेस हायवेला लागलो. इथे एका बाजूला लॉक (लेक) एली चे लांब पात्र तर  दुसऱ्या बाजूला हायवेलगत हॉटेल्स, लॉज, होम स्टे गोव्याची आठवण करून देत होते. 5 किमी सायकलिंग नंतर हॉटेल कॅलेंडोनियन मध्ये रूम ताब्यात घेऊन तयार होऊन आमची स्वारी निघाली शिखर नेव्हीस रेंज कडे. बाहेर पाऊस सुरू तसेच भिजत सिटी सेंटर मधील विविध मॉल्स पाहत एव्हरनेस हायवेला लागलो. वाटेत माल्ट व्हिस्की डीस्टीलरी ला बाहेरूनच भेट कारण मी मद्यपान करत नाही त्यामुळे चव काय पाहणार ?

पुढे बहुराष्ट्रीय कंपनी बाल्फर ब्युटी सारख्या कंपनीचे ऑफिस, बिझी हायवे पण सायकलिस्टच्या सेफ्टीसाठी सायकल ट्रॅकवर पेडलिंग करत विविध लाकडी पूल ओलांडत पुढे टोर्लंडी येथून जंगलात प्रवेश केला. इथून 2 रोड नेव्हीस रेंज कडे वाटेत एका गृहस्थ जो कॅराबन दुरुस्त करत होता त्यास रस्ता विचारताना एकमेकांना ओळख सांगताना तो म्हणाला 'डू आय लूक लाईक ब्रिटिश' ? मी म्हटलो 'नो'.!

"आय एम इटालियन बट सेटल्ड हियर मेनी यिअर्स बँक. अनिवे इटालियन - इंडियन आर फ्रेंड्स. गो थ्रू  फॉरेस्ट डोन्ट वरी टेक मेन रोड अव्हॉइड्स शॉर्ट कट, हॅव सेफ सायकलिंग". त्याचा निरोप घेऊन जंगलातून निघालो 15 मिनिट झाले कोणीच भेटत नव्हते, एकेरी रस्ता घनदाट जंगल, निर्मनुष्य, चढ असल्याने पहिल्या गियरवर पेडल मारून टॉपला आलो तर स्वच्छ सुंदर झऱ्याचे दर्शन झाले. झऱ्याच्या पाण्याचा आवाज परिसरात घुमत होता आणि या वातावरणात मी माझी सायकल आणि हे जंगल जरी आम्ही एकदुसऱ्यासाठी अनोळखी असलो तरी काय झाले पण पर्यावरण रक्षणाच्या ध्येयामुळे आम्ही एकरूप झालो होतो. आता जंगलाची भीती देखील दूर झाली होती. पुढे गेट ओलांडून नेव्हीस रेंज पोहोचलो. इथे ट्री स्पोर्ट, माऊंटन बाईक अडव्हेचर, स्नो स्पोर्ट सारखे अनेक साहसी खेळ होते. पण हवामान खराब झाल्याने स्नो स्पोर्ट कॅन्सल झाले पण केबल कार सुरू होती. तिकीट घेऊन केबल कार मध्ये चढून आमचा प्रवास सुरू. हळूहळू एक एक चढ, डोंगर रांगाना मागे टाकत वर जात होतो आणि केबल कार मधून एका बाजूला दरी, दुसऱ्या बाजूला डोंगराच्या समांतर आलेले ढग, धुके, वाहणारे झरे आणि वर दिसणारा बेन नेव्हीस शिखर. थोड्या वेळाने वर आलो आणि बाहेर पाहतो काय स्नो फॉल सुरू....आयुष्यात पहिल्यांदाच स्नो फॉल अनुभवला. मजा येत होती पण सोबत थंडी देखील वाजू लागली कारण एकीकडे पावसाने पूर्ण जॅकेट, अंग ओले झाले होते आणि दुसरीकडे स्नो फॉल मुळे पूर्ण अंग कुडकुडत होते, बोटे गारठली होतीतसेच डोंगर माथ्यावर फिरलो. आयुष्यात युके मधील सर्वात उंच शिखर च्या माथ्यावर बर्फवृष्टीत भटकायचा आनंद वेगळाच होता. पण वातावरण खराब झाल्याने सर्व स्नो स्पोर्ट बंद झाले होते आणि काही बाईकर्स देखील काळजीपूर्वक स्टँटिंग करत उताराने खाली गेले तर काहींनी वातावरण पाहून माघार घेतली. येथे अनेक भारतीय मित्रांची भेट झाली. केरळ, पंजाब, कर्नाटक, अंदमान, दिल्ली - सर्वांची एकच ओळख आम्ही भारतीय. सर्वांशी गप्पा मारून सर्वात स्वस्त गरम एसप्रेसो सिंगल शॉट कॉफी ऑर्डर केली - चव एकदम कडू मग थोडे गरम पाणी, दूध साखर मिसळून आता चव आली आणि सोबत तरतरी देखील. सगळीकडे बर्फाच्छदित डोंगर आणि वाहणारा उलटा वारा, थंडी यात कसेबसे फोटो घेऊन खाली आलो. सायकल घेऊन पुन्हा परतीचा प्रवास सुरू. जंगलात उतारावर सुसाट सायकल पळत होती पण तितकेच नियंत्रण आवश्यक होती  कारण पावसामुळे स्लिप व्हायची शक्यता होती. पुढे हायवेला लागलो आता पावसाचा जोर वाढला शिवाय भूक देखील लागली होती. अर्ध्या तासानंतर सिटी सेंटर जवळ मॅक डोनाल्ड मध्ये केवळ 2 पौंड मध्ये व्हेज रॅप खाल्यावर थोडी एनर्जी मिळाली. आता शहरात थोडं भटकत हॉटेलला पोहोचलो. बर्फवृष्टी, पावसात जंगलातील एकेरी आणि निर्मनुष्य रस्त्यावर सायकलिंग, केबल कार, बेन नेव्हीस माऊंटन टॉप वरील थरार आदी आठवणीचा खजाना सोबत घेऊन. 

आज पाऊस आणि बर्फवृष्टीत केलेली सायकल राईड माझ्या साठी विशेष होती. हिवाळ्यात परभणीत 3'C मध्ये केलेली सायकलिंग येथे कामी आली. 

उद्या बर्फवृष्टी चा अंदाज आहे बघू कसे तोंड देऊन इतरही निसररम्य ठिकाणी भेट देता येईल 

 

Day 6: 2 April 2019 फोर्ट विलियम ग्लेन नेविस जंगल सायकल भ्रमंती

 

काल स्नो फॉल आणि पावसात भिजल्याने अंग कुडकुडत असतांना सरळ हॉटेल पोहोचून टी मेकरवर गरम कॉफी शीतल सूनबाईने टिफिन मध्ये दिलेले पराठे भाजी जेऊन थोडं लिखाण करून झोपले. सकाळी 06:30 वाजता जाग आली तर बाहेर पाहतो काय पाऊस थांबला होता आता बिछान्यात लोळता तयार होऊन बाहेर आलो. 1'C तापमान बोटे गारठली होती तसेच लॉक(लेक) साईडने ग्लासगो हायवेवर सायकल चालवत निघालो. एक बाजूला डोंगर कपारी दुसऱ्या बाजूला लेक आणि मधून हायवेवर सायकलिंग सुरू काहीही त्रास होता कारण चारचाकी वाहने जो पर्यंत समोर रोड क्लीयर होत नाही तो पर्यंत सायक्कीस्टला कोणताही त्रास देता उगाच कर्णकर्कश हॉर्न वाजवत ओव्हरटेक करत नाही. उलट रस्त्याच्या जंक्शन ला रस्ता ओलांडताना सायकलिस्टला आधी जाऊ देतात शुभेच्छा देतात. सायकल ट्रॅकवरून चालतांना वॉक करणारे असो की सायकलिस्ट एकमेकांना हाय, हॅलो,गुड सायकलिंग आदी शुभेच्छा देतात. ११ किमी नंतर लॉक लीने(लेक)च्या किनारी सूर्योदयाचा आनंद आणि लेकच्या स्वच्छ पात्रात डोंगर आकाशाचे प्रतिबिंब न्याहाळत निवांत बसलो. पुढे कोरण फेरी पर्यंत जाऊन लेक ओलांडण्यासाठी असलेल्या मोठ्या बोटी पाहिल्यावर गोवा कोंकण मधील जेट्टी ची आठवण आली. वाटेत बंद पडलेल्या 12 चाकी वाहनसाठी खास सर्व सुविधांनीयुक्त मोबाईल व्हॅन, ठिक ठिकाणी पर्यटकांच्या कॅरोबन दिसत होत्या. नाश्त्याची वेळ झाली होती म्हणून थांबता 30 मिनिटात 12 किमी गाठून परत हॉटेल गाठले. आता खरी पंचाईत सगळे नॉन व्हेज डिश मग व्हेज साठी विनंती केल्यावर व्हेज सॉसेज, ब्रेड जाम बटर आणि दुध कॉर्न फ्लेक्स आणि शेवटी गरम कॉफी घेतली. कॉफीची मजा म्हणजे आधी कॉफी असलेले गरम पाणी ओततात आणि मग हवे तसे दूध, साखर घ्यायची आणि साखर देखील कमी गोड पण अश्या थंड वातावरणात कडू कॉफी देखील चालते. फ्रेश होऊन हॉटेल चेक आऊट करून बाहेर येऊन पाहतो तर काय साक्षात निसर्ग म्हणाला आज जितकी मजा करायची ती करून घे  कारण बाहेर लख्ख सूर्यप्रकाश आणि मोकळे आकाश ! फोर्ट विलियम गाव ओलांडून बेन नेव्हीस पार्किंग पोहोचलो. इथे ट्रेकिंग, हायकिंग साठी मोठी पार्किंग, कॅम्पिंग साठी जागा, टुरिजम सेंटर आणि बसायला जागोजागी लाकडी बेंच. वॉकिंग ट्रॅक वरून फोर्ट कडे निघालो अत्यंत खडबड फॉरेस्ट रोड खास वन विभागाच्या वाहतूक साठी, वाटेत ठीक ठिकाणी चिखलातून चढ चढत एका पॉईंटला आलो. पूढे लाकडी ओंधे उचलण्याचे काम सुरू होतेशिवाय सायकलसाठी रस्ता बंद होता तरी विचार केला थांबून जावे पण या मनाच्या चल बिचालचा फायदा पावसाने घेतला. स्नो फॉल सुरू झाला मग नाईलाजाने माघारी निघालो तरी बेन नेव्हीस च्या 6 mile वरील फोर्ट पॉईंट पर्यंत पोहीचण्याचे वेगळे समाधान मिळाले. पण इथून जंगलातील दुसऱ्या रोडने बेन नेव्हीसच्या स्टील जॉर्ज & वॉटरफॉल कडे निघालो. हा जंगलातील रस्ता देखील खडतर होता उतारावर, चिखलातून आणि बाजूला पडलेले लाकडी ओंडके यातून मार्ग काढत अधिक सावधपणे सायकल चालवत लोवर वॉटरफॉल कॅम्प पोहोचलो तर गेट बंद! मग थोडं हलवून पाहिल्यावर ट्रिकने गेट उघडून शिष्टाचार पाळत बंद केले. वाटेत अनेक ट्रेकर्सना राम राम घालत लोवर वॉटरफॉल च्या बेस ला पोहोचलो. इथून घाट सुरू 4,3, 2 करत गियर 1 वर घेतले कारण चढ तितकाच स्टीप होता. एका बाजूला खळखळ आवाज करत वाहणारा धबधबा आणि दुसऱ्या बाजुला बर्फाच्छादित डोंगर रांगा अश्या छान वातावरणात सायकलिंग मुळे थंडी पळाली होती. वाटेत सायकलिंग आणि ट्रेकर्स साठी लाकडी ब्रिज आणि खालून वाहणाऱ्या धबधब्याचा प्रवाह एक वेगळाच रोमांच देणारा अनुभव होता. थोड्या वेळाने स्टील जॉर्ज पॉइंटवर पोहोचलो. इथून 1 mile पायी चालावे लागते आणि डोंगराच्या माथ्यावरून अर्थात बेन नेव्हीस टॉपवरून मिळणारा युके तील शिखर चढल्याचा आनंद. पण 1 mile बाकी असतांना वेळेची मर्यादा आणि सायकल सोडून चढणे शक्य नसल्याने जे मिळाले त्यात समाधान मानून परतीचा प्रवास सुरू केला. वाटेत झऱ्याच्या पात्राजवळ थोडं निवांत मी आणि ती (सायकल) बसून निसर्गाच्या सौंदर्याची उधळण अनुभवत होतो. पुढे वाटेत दाट हिरवळीवर चरणाऱ्या मेंढ्या, गुरं दुसरीकडे दाट जंगलातुन मार्ग काढत युथ हॉस्टेल पोहोचलो. इथे वेगवेगळ्या देशातून आलेले सायकलिस्ट भेटले. इथून खास सायकलिंग ट्रॅक, विशिष्ट खडीचा रस्ता,लाकडी पूल आणि जंगल आणि वाटेत भेटनारे आमच्या सारखे भटके असा खास माहोल. दुपारी भूक लागल्याने मॅक डोनाल्ड (युके तील सगळ्यात स्वस्त चेन) फ्रेंच फ्राईज मागवले तर त्याने लार्ज साईज समजून sprite दिले मग विनंतीवरून बदलून दिले. पुढे सायककिंग ट्रॅक ने कॅओल कडे निघालो वाटेत दिस्टीलरी, सायकलिंग शॉप्स ओलांडत एका ऐतिहासिक कॅसल ला भेट दिलीपुढे खास सायकलिस्ट साठी बांधलेल्या 'सोल्जर्स ब्रिज' सायकलवर चढून खळखळ आवाज करणाऱ्या नदीचे पात्र ओलांडायचा वेगळाच अनुभव होता. पुढे  सायकल ट्रॅकने कॅओल येथील कॅन्सर रिसर्च फाउंनदेशनला भेट दिली. पुढे फोर्ट विलियम गावातील कॅथॉलिक चर्च, फोर्ट विलियम स्टेच्यु, कॉमनवेल्थ वार ग्रेव्हज आदी ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. वेळेची मर्यादा असली तर दिवसभरात 85 किमी आणि कालची 45 किमी ऐकून 130 किमी  सायकलिंग, ग्लेन नेव्हीसचे जंगल डोंगरात सायकल भ्रमंती, बर्फात ट्रेकिंग, 0'C मध्ये सायकलिंग अनेक भन्नाट अनुभवासह फोर्ट विलियम ट्रेन स्टेशन हुन लिनलिथगो कडे परततोय. 

 रात्री उशिरा पोहोचेल.