दिवस ३: ३० मार्च 2019 लिनलिथगो - बोनेस शॉर्ट सायकलिंग राईड ३० किमी
आज माझी पुतणी 'पहेल' राणी च्या वाढदिवसाची पार्टी मग विचार केला सकाळी 8 पर्यंत शॉर्ट सायकल राईड मारावी म्हणून आज हायवे रोड घेतला. सकाळच्या वातावरणात विंड सपोर्ट छान होता. गल्ली बोळ्यातून मार्ग काढतांना असे वाटत होते की एकाच प्रकारच्या घरांच्या रचनेत आपण पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी फिरतोय. लिनलिथगो हे स्कॉटलँड च्या राणी मेरी चे जन्मस्थळ आहे. या गावास ब्रिटन मधील फेअर ट्रेड सिटी अवॉर्ड मिळाले आहे. पुढे दुतर्फा झाडीतून मार्ग काढत ब्लॅकनेस कॅसल (राजवाडा ज्याला ब्लॅकनेस असे नाव पडले) ऐतिहासिक शहर लागले. पुढे चढ उताराच्या रस्त्यावर पेडलिंगला मजा येत होती. सकाळची वेळ असल्याने वाहतूक तुरळक होती तरी वाटेत सायकलिस्ट भेटत होते. वाटेत एका हिरवळीने अच्छादित टेकडीवर ढस्त पुस्ट मेंढ्या चरत होत्या. एक छोटा चढ चढल्यावर पुढे बोनेस शहर लागले जे येथील राजा हर्कस स्ट्रॅकन चे जन्मगाव आहे आणि ऐतिहासिक शहर आहे. बोनेस शहरातून जातांना फोर्थ नदीचे अथांग पात्राचे दुरून दर्शन झाले आणि त्यावरील मोठे मोठे बोट हे सौंदर्य न्याहाळून पुढे निघालो. दुरून 'क्विंसफेरी क्रॉसिंग' या दोरीवरील पुलाचे दुरून दर्शन घेऊन निघालो. वाटेत 'कीनेल हाऊस' व 'कीनेल पॅलेस' पाहून ग्रेन्ज माऊथ रोड वर औद्योगिक वसाहत लागली. येथील एक गोष्ट मला फार आवडली की औद्योगिक वसाहतीत प्रदूषण नियंत्रण करिता आसपास दाट झाडे लावली आहेत. ०७:३० झाले होते आता लवकर परत जायचे म्हणून यु टर्न घेऊन 2 किमीचा चढ 2/3,4 गियर बदलत सहज चढलो. वाटेत डग्लस गार्डन तेथील हिरवळीवर थोडी विश्रांती आणि पाण्याचा ब्रेक घेऊन सहज लिनलिथगो पोहोचलो. आज छोटीशी ३० किमी सायकल राईड पण दिवसभरासाठी ऊर्जा देऊन गेली.

No comments:
Post a Comment