Thursday, January 27, 2022

गनोर दिल्ली मानेसर 125 किमी























 15 नोव्हेंबर रोजी सकाळी आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी व भेटण्यासाठी अनिलजी खास सोनिपत हुन 6 वाजता कार चालवत आले होते. त्यांनीच काल च्या मुक्काम व जेवण्याची सोय केली होती. त्यांनी टी शर्ट देऊन आम्हा दोघांचे स्वागत केले व सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. अब दिल्ली दूर नहीं म्हणत आम्ही पेडलिंग करत सोनिपत ओलांडून दिल्ली कडे निघालो. वातावरणात गारवा आणि कडाक्याची थंडी होती त्यामुळे स्वेटर काढले नव्हते. सोनिपत नंतर औद्योगिक वसाहत सुरू झाल्याने शेते नाहीशी झाली होती.  पुढे गाजीपुर टिकरी चेक पोस्ट जवळ किसान आंदोलन चे टेंट लागले होते. त्यात त्यांचे लंगर उभारले होते. त्यांनी वाटेत ये जा लोकांची, शेतकरी आंदोलकांची भोजन नाश्ता चहा ची मोफत सोय केली होती। विविध समाजिक संस्था, राजकीय पक्ष यांचे त्यांना समर्थनार्थ बोर्ड दिसत होते. पुढे पोलिसांना विचारून सायकल साठी योग्य मार्ग विचारून आम्ही एक शॉर्टकट घेतला.  परंतु त्या रस्त्यात खूपच धूळ, ट्रॅफिक, दगड धोंडे, माती शिवाय तो रस्ता कॅनॉल शेजारून जात होता वाटेत पंचर ची भीती होती, नुसते धुळीचे साम्राज्य यातून फुल ट्रॅफिक मग धूर ओकणारे व कर्णकर्कश हॉर्न वाजवणारे मोटारसायकल, ऑटो यातून मार्ग काढत अखेर एक कॅनॉल लागला त्याच्या बाजूने एक 2 -3 किमी ची पाऊलवाट ने सायकल चालवत अखेर 45 मिनिटांनी चेक पोस्ट लागली. तिथे SRP जवान व दिल्ली पोलिसांनी आमची विचारपूस केली आणि आम्ही  त्यांच्या सोबत फोटो काढले. त्यांनी शुभेच्छा दिल्या. 

10 वाजले होते आता इंडिया गेट दिल्ली 30 किमी. पुढे एका पेट्रोल पंप वर चहा बिस्कीट चा नाश्ता करून दिल्लीत प्रवेश केला. इथे एक उड्डाणपूल चढून इंडिया गेट राजघाट कडे रस्ता जातो पण आम्ही चुकलो आणि रोहिनी कडे जाणाऱ्या एका मेट्रो स्टेशन वर गेल्यावर चूक लक्षात आली. या दरम्यान दिल्ली मधील काही होमिओपॅथिक डॉक्टर्स जसे डॉ ललित संदल, डॉ आदित्य कौशिक यांचा फोन की त्यांच्या घरी या म्हणून. पण हे राजधानी दिल्ली आहे आणि practically अंतर इतके लांब असते की फिर कभी फुरसत से दिल्ली आया तो जरून आऊगा म्हणून त्यांना नकार दिला. आणि पुन्हा 5 किमी फिरून दिल्लीच्या ट्रॅफिक मध्ये सांभाळून चालवत पुन्हा मार्गी लागलो. उड्डाणपूल चढताना व जंकशन वर सांभाळून रस्ता ओलांडावा लागत होता. कारण जो तो सायकल ला कसे रस्त्याच्या खाली दाबू अशा आवेशाने चालवत होता. पुढे राजघाट जवळ आम्हाला यमुना मैया (नदीचे)चे दर्शन झाले. पुढे प्रगती मैदान मार्गे इंडिया गेट पोहोचलो.

इथे काम सुरू असल्याने सायकल अलीकडे पार्क केली. सुरवातीला सायकल ला प्रवेश नाही म्हणाले पण नंतर सायकल वरील बोर्ड पाहून प्रवेश दिला. इंडिया गेट येथील वार मेमोरियल ला भेट देऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. 

इंडिया गेट येथे SBL होमिओपॅथी च्या टीमचे कौशल शर्मा व सर्व टीमने आमचे स्वागत केले. शिवाय दुपारच्या मिनी लंच ची व्यवस्था केली. इंडिया गेट येथील जवानांनी आमच्या मोहिमेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. 

अखेर 2 वाजता दिल्ली चा निरोप घेण्याच्या उद्देशाने आम्ही निघालो.आजचा मुक्काम हरयाणा मधील जयपूर हायवेवर मानेसार किंवा गुरुग्राम च्या दिशेने निघालो. ठिकठिकाणी ट्रॅफिक सिग्नल ओलांडत लोकांना विचारात धौला कुंवा पोहोचलो. 

इथून पुढे एक रस्ता इंदिरा गांधी  हवाईअड्डा तर दुसरा गुडगाव कडे जातो.  आम्ही चुकून उड्डाणपूल चढलो पण त्यावरील ट्रॅफिक मुळे आम्हाला साईड ला जाताच येईना. वाहनेच वाहने एकही वाहन हात दाखवून देखील आम्हाला बाजूला जाऊ द्यायला तयार नाही. अखेर एका इनोव्हा वाल्याला दया आली आणि त्याने मार्ग करून दिला. खाली येऊन पाहतो तर काय आम्ही विमानतळ रस्त्याला लागलो होतो. 2 किमी परत यु टर्न घेऊन गुडगाव हायवेला लागलो. 

पुढे गुडगाव जवळ चहा ब्रेक साठी थांबलो. पाटणकर सर उड्डाणपूल चढून व दिल्लीतील ट्रॅफिक व प्रदूषण मुळे बरेच थकले होते. पण त्यांचे सांत्वन केले.  आम्ही दोघांनी मस्त केळी खाल्ली व गरम चहा बिस्कीट पिऊन गुडगाव गुरुग्राम हायवेने निघालो. वाटेत गुडगाव सायकलिंग क्लब च्या सदस्यांनी आम्हास शुभेच्छा दिल्या. वाटेत महादेव चे प्रसिद्ध मंदिर लागले आम्ही बाहेरून दर्शन घेऊन मार्गस्थ झालो. गुडगाव सायकलिंग क्लब चे सायकलिस्ट आमच्या सोबत गुरुग्राम पर्यंत आले व निरोप घेऊन मार्गस्थ झाले. 

पुढे मानेसार जवळ आलो तेंव्हा पाटणकर सरांचा एकदम आवाज आला. एका पेट्रोल पंप जबल मी थांबलो आणि काय झाले विचारत असतांना बाजूला असलेल्या लॉन वर ते स्वतःला झोकून एकदम लोळायला लागले. त्यांना थोड्या वेळाने पॅक ऑरेंज ज्यूस दिले. ते म्हणाले सर पुढे जाऊ शकत नाही मी त्यांचे सांत्वन करून मुक्कामाचे ठिकाण शोधुया म्हणत मानेसार पोहोचलो.

इथे गुरुद्वारा किंवा मंदिर काहीच नव्हते शिवाय औद्योगिक वसाहत असल्याने मोजकेच फ्लॅट system च्या इमारती असल्याने मुक्काम कुठे करावा अशा मनःस्थितीत असताना अचानक एक बुलेट स्वार समोर येऊन उभा ठाकला आणि म्हणाला "Do you need any help ? " 

मी न लाजता सरळ विचारलं  "इथे राहायला मंदिर किंवा गुरुद्वारा आहे का " . तेंव्हा  तो म्हणाला गावात एक चक्कर मारा पुढील 5 मिनिटं मध्ये तुम्हाला कळवतो असे म्हणून तो पुढे निघालो. पण पुढील 5 मिनिटांनी त्यांचा कॉल की "की, तुमची व्यवस्था माझ्या घरी केली आहे. त्यांनी घरी नेऊन प्रेमाने आदरातिथ्य केले. " 

पहा एक अनोळखी प्रदेश, शहर पण त्यात भेटलेला हा ग्रेट माणूस वशिष्ठ भाई. वशिष्ठ भाई हे पाकिस्तान मधून आलेल्या निर्वासित हिंदू  च्या पुनर्वसन साठी फार मोठे कार्य करत आहेत. रात्री त्याने प्रेमाने जेऊ घातले. याच दिवशी गुडगाव ला जॉब करणारा मराठी माणूस सौरभ नेगी ची भेट झाली. रात्री वशिष्ठ भाई सोबत सायकलिंग, सामाजिक कार्य, एड्स ग्रस्तांच्या प्रश्नांवर सुरू कार्य त्याचे ट्रेकिंग मधील व सामाजिक कार्य तील अनुभव विषयी गप्पा झाल्या. रात्री त्याच्या आई ने प्रेमाने जेऊ घातले. शिवाय त्यांनी पाटणकर सरांना acupressor द्वारे मसाज देऊन त्यांचा थकवा, पाठदुखी दूर केली.

डॉ पवन चांडक 

9422924861

Wednesday, January 26, 2022

14 नोव्हेंबर: अंबाला कुरुक्षेत्र पानिपत 140 किमी















शर्मा कुटुंबातील खास हरियानी पाहुणचार आणि रात्रीच्या सात्विक भोजनामुळे छान झोप घेऊन सकाळी वेळेवर उठून आटोपून शर्मा कुटुंबाचे आभार मानून  सकाळी 6:30 वाजता सर्वांचा निरोप घेऊन अंबाला सोडले. थंडी बरीच होती जवळपास 6'C तरी तापमान होते आणि धुके पण तरी व्यवस्थित सायकल चालवत होतो. अंबाला दिल्ली हायवे बराच व्यस्त असतो शिवाय दिल्ली जाणाऱ्या बऱ्याच ट्रॅव्हर्ल्स सुसाट धावत होत्या. हायवेच्या दुतर्फा शेतामध्ये गव्हाची पिके दौलत उभी होती. 7 वाजता सूर्यनारायण आपल्या प्रकाश किरणांद्वारे आम्हाला आशीर्वाद देत जणू म्हणत होता बाबांनो सांभाळून चालवा.  वाटेत चहा ब्रेक घेऊन सोबत आणलेले राजगिरा लाडू खाऊन आरामात पेडलिंग करत  सकाळी 9 वाजता 45 किमी सायकलिंग नंतर धर्मनगरी कुरूक्षेत्र पोहोचलो.

 तिथे इंडियन असोसिएशन ऑफ होमिओपॅथिक फिजिशियन चे डॉ उमेश खन्ना, डॉ अनुप सिंगला व डॉ विवेक ललित यांनी स्वागत केले. त्यांच्या सोबत नाश्ता करत या सायकल मोहिमेचा उद्देश शिवाय एचआयव्ही एड्स ग्रस्तांचे मूलभूत प्रश्न सोबत मुलींचे शिक्षण शिवाय Gender Equality विषयी केलेले कार्य व पुरुष नसबंदी आदी विषयीचे अनुभव शेअर केले. डॉ उमेश खन्ना हे त्या भागातील ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ञ असून केंद्रीय होमिओपॅथिक अनुसंधान परिषद च्या विविध संशोधन कार्यात त्यांनी मोलाचा सहभाग नोंदवला आहे. डॉ अनुप होमिओपॅथी औषधी कशी काम करतात या विषयी मॉलीक्युलर पातळीवर संशोधन करत आहेत. त्यांनी पुढील दिल्ली, जयपूर आदी मार्गावर डॉक्टर मित्रांना आमच्या सायकल मोहिमेत सर्वतोपरी सहकार्य करण्याविषयी सूचना दिल्या. तेथे दैनिक अमर उजाला, दैनिक भास्कर, दैनिक जागरण, दैनिक ट्रिब्युन आदी दैनिकांच्या पत्रकारांनी आमच्या उपक्रमास प्रसिद्धी दिली व कार्य जाणून घेतले.

 कुरुक्षेत्रचे नाव पौराणिक काळामधील कुरू राजावरून पडले आहे. महाभारतामधील कौरव व पांडवांदरम्यान झालेले कुरुक्षेत्र युद्ध येथेच लढले गेले असे मानले जाते. ह्या युद्धादरम्यान आप्तेष्ठांसोबत लढण्यास अनुत्सुक असलेल्या अर्जुनाला उपदेश देण्यासाठी भगवान कृष्णांनी भगवद्गीता सांगितली होती. हिंदू पुराणानुसार कुरुक्षेत्र हे एक शहर नसून भौगोलिक प्रदेश आहे असे मानले गेले आहे.१९४७ सालापूर्वी थानेसर हे ह्या भागातील प्रमुख शहर होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी कुरुक्षेत्र शहर वसवले गेले. राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, कुरुक्षेत्र येथेच स्थित आहे.


सगळ्यांच्या निरोप घेऊन आम्ही करनाल च्या दिशेने रवाना झालो. जवळपास 75 किमी सायकलिंग नंतर दुपारी 12:30 वाजता दानविर कर्ण ची नगरी करनाल येथे पोहोचलो. 


करनाल हे यमुना नदी च्या किनाऱ्यावर वसलेले शहर असून येथील कलंदर शाह गुंबड, छावणी चर्च आणि सीता माई मंदिर आणि कर्ण जलाशय इत्यादी प्रमुख प्रेक्षणीय स्थळे आहेत. कर्नाल येथील केंद्रिय गहू संशोधन आपल्या सर्वांना परिचित असेल. तसेच येथील बासमती तांदूळ संपूर्ण भारत तसेच भारताबाहेर देखील निर्यात केला जातो.


वाटेत डॉ विमल धवन सरांचे फोन येत होते परंतु रोड वर चुका मूक झाल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. या भागात Industries मुळे म्हणा दुपारी ऊन बरेच तापले होते. करनाल शहरात प्रवेश करतांना आम्हाला एक मोठा वेस्टर्न यमुना कॅनॉल लागला. जवळच प्रसिद्ध कर्ण तलाव आहे तो पाहिला. पुढे वेस्टर्न यमुना कॅनॉल  ओलांडून करनाल शहरात प्रवेश केल्यावर डॉ धवन यांचा मुलगा प्रतीक धवन याने मुख्य चौकात आमचे स्वागत केले. त्याच्या सोबत त्याचे मित्र व बरेच पत्रकार होते. त्यांना आमच्या सायकल मोहिमेविषयी जाणून घ्यायची खूप इच्छा होती. त्यांना विशेष म्हणजे कोणतेही बॅकअप न घेता तसेच स्पॉन्सरशीप न घेता करत असलेल्या सायकल प्रवासाचे कौतुक वाटले. त्यांनी आम्हाला दाल मखणी रायता तंदूर रोटी चे जेवण जेऊ घातले व पचण्यासाठी जीरा सोडा पाजला ज्यामुळे अत्यंत ताजेतवाने वाटले. प्रतीक व पत्रकार मित्रांचा निरोप घेऊन आमची स्वारी पानिपत सर करायला निघाली. 

उन्हात व्यवस्थित पांढऱ्या रुमालाने डोके झाकून वाटेत घोट घोट  पाणी पीत रस्त्याच्या डाव्या बाजूने व कडेकडेने व उड्डाणपूल चढताना सावधपणे सायकल चालवत होतो. अखेर पानिपत जवळील टोल प्लाझा येथे पोहोचलो. तिथे पवन अरोरा यांच्या पानिपत सायकल क्लब ने लिंबू सोडा पाजून स्वागत केले. पानिपत सायकल क्लब या नावे छान असा सायकल क्लब सायकलिंग चा प्रसार करत आहे. पुढे पानिपत शहरात प्रवेश केला. 

पानिपत येथे इंडियन असोसिएशन ऑफ होमिओपॅथिक फिजिशियन चे डॉ अरुण व डॉ भरत मनोचा यांनी दुपारचा स्वादिष्ट नाश्ता व लस्सी पाजली. त्यांच्या सोबत पानिपत येथील बऱ्याच नागरिकांशी आमच्या एड्स जनजागृती सायकल मोहिमेविषयी संवाद साधता आला. 

पानिपत युद्ध संग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेले स्मारक तिथून बरेच लांब व दुसऱ्या रस्त्याने असल्याने आम्ही तिथे भेट देऊ शकलो नाही याची खंत राहिली. 

सायंकाळ चे 04:30 वाजत आले होते आणि 120 किमी सायकलिंग झाली होती पण मुक्काम लांब असल्याने पानिपत च्या मित्रांचा निरोप घेऊन आम्ही  आम्ही सोनिपत च्या दिशेने निघालो.  परंतु मुक्काम कुठे करावा हा प्रश्न होता कारण सकाळपासून 120 किमी झाले होते. 

पुढे पानिपत च्या थोडे पुढे एक मोटारसायकलवर युवक आमच्याशी मोहिमेविषयी बरेच विचारत होता. त्याने आम्हाला सायंकाळचे जेवण जेऊ घालण्यासाठी आग्रह केला. परंतु आम्ही नम्रपणे त्यास नकार दिल्यावर त्याने  चहा पाजला व बिसलेरी बॉटल भरून दिली. त्याने काही अडचण आल्यास त्याचा नंबर दिला. त्याचा निरोप घेऊन  थोडे पुढे आल्यावर तितक्यात सोनिपत येथील अनिल भाई यांचा फोन आला. अनिल भाई यांचे ट्रॅक अँड ट्रेलचे सायकलचे दुकान असून ते सोनिपत सायकलिंग क्लब चे संस्थापक आहेत.

त्यांनी आमची व्यवस्था हायवेला गणोर येथे मित्रो दा ढाबा येथे केली आहे असे सांगितले. पहा अनोळख्या ठिकाणी अनोळख्या व्यक्तीने आमची भेट नाही तरी आम्ही मुक्कामी पोहोंचे पर्यंत आमची व्यवस्था झाली.......याला म्हणतात हरयाणा तील अस्सल पाहुणचार. 

धन्य ती हरयाणा ची माती व हरयाणा ची माणसे🙏.

सायंकाळी 6 वाजता आम्ही सकाळपासून 140 किमी सायकलिंग करत मित्रो दा ढाबा येथे मुक्कामी पोहोचलो. तिथे ढाबा चालकाने आमचे स्वागत केले. गेल्या गेल्या त्याने कुलाडी मध्ये गरमा गरम मसाला चहा दिला व आमच्या साठी छान खोलीत राहायची सोय केली होती.

गरम पाण्यांने अंघोळ करून ताजेतवाने झालो.

 रात्रीला छान पंजाबी जेवण - तंदूर रोटी, सरसोची भाजी दाल मखणी आदी स्वादिष्ट जेवण होते. झोपतांना मसाला दूध मिळाले. त्याला बिल विचारले तर म्हणाला अनिल भाई ने दे दिया है. 

 उद्या दिल्ली सर करायची असल्याने शरीराला आराम हवा तर वेळेवर 9 वाजताच लवकर झोपी गेलो. 


उद्या सायंकाळी 15 नोव्हेंबर रोजीच्या गनोर सोनिपत दिल्ली माणेसर चा अनुभव शेअर करेल. धन्यवाद 


डॉ पवन चांडक 

9422924861

Tuesday, January 25, 2022

१३ नोव्हेंबर २०२१ फगवाडा - लुधियाना - खन्ना - राजपुरा - अंबाला १६५ किमी




























 

१३ नोव्हेंबर २०२१ फगवाडा - लुधियाना - खन्ना - राजपुरा - अंबाला १६५ किमी

13 नोव्हेंबर, रोजी सकाळी उठून आवरून विशाल अशा बजरंगबलीच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही अंबाला च्या दिशेने मार्गस्थ  झालो. सकाळी बरीच थंडी आणि धुके होते, तरी आम्ही शक्यतो लाईट लावून रेफलेक्टर जॅकेट घालून सायकल चालवत होतो. शिवाय उड्डाणपूल वरूनच सायकल चालवत होतो. एक तर खालून स्पीड ब्रेकर, ट्रॅफिक पासून वेळ वाचवत होतो. केवळ एकच अडचण होती ती म्हणजे पाटणकर सरांची सायकल विना गियर असल्याने उड्डाणपूल चढतांना त्यांची दमछाक होत होती.
वाटेत चहा बिस्कीट ब्रेक घेऊन लुधियाना जवळ सतलज नदी वरील विशाल ब्रिज ओलांडला.

सतलज नदी पंजाबमधून वाहणाऱ्या पाच नद्यांपैकी सगळ्यात मोठी नदी आहे. सतलजचा उगम तिबेटमधील राक्षसताल सरोवरातून होतोहिमाचल प्रदेशमध्ये साधारण पश्चिम-आग्नेयेस दिशेत ३६० किमी वाहल्यावर तिचा संगम बियास नदीशी होतो

08:30 ला लुधियाना कृषी विद्यापीठ जवळ पोहोचलो. लुधियाना येथील कृषी विज्ञापीठ बरेच प्रसिद्ध आहे. थोड्याच वेळातडॉ शर्मा’ यांचाअंबाला’ हुन फोन की अंबाला येथे गुरुद्वारा येथे थांबता त्यांच्या घरीच मुक्काम करायचा म्हनुन आग्रहाचे निमंत्रण दिले.
लुधियाना शहरातील ट्रॅफिक टाळून आम्ही बायपास ने शहर ओलांडत होतो. डाव्या बाजूला लुधियाना येथील कारखाने इंडस्ट्रीज, तर उजव्या बाजूला लुधियाना शहर. लुधियाना हे सायकल, ऑटोमोबाईल पार्ट्स तसेच वुलन कपडे शॉल साठी प्रसिद्ध आहे. 10 वाजता 55 किमी सायकलिंग नंतर लुधियाना बाहेर पडल्यावर भूक लागली होती. एका टपरीवर चहा नाश्ता काल डॉ रश्मी मॅडम ने दिलेले पनीर पकोडे चे पार्सल खाल्ले. बघा पंजाबी लोकांचे प्रेम, इथे पण आमच्या सोबतच होते. इथे काही ट्रक ड्रायव्हर्स सोबत एड्स जनजागृती सोबत त्यांना जे कुटुंबापासून महिनोंमहिने दूर राहत असल्याने जे लैंगिक संबंध येतात त्यात त्यांना सुरक्षित लैंगिक संबंध वेळोवेळी एचआयव्ही तपासणी साठी माहिती दिली. तसेच एचआयव्ही एड्स च्या प्रसार, संक्रमण, समज गैरसमज निदान उपचार संबंधी माहिती दिली.
पुढेखन्ना’ गावाकडे निघालो. ‘खन्ना’ येथे पोहोचल्यावर चौकात पाहतो तर कायखन्ना’ येथीलइंडियन असोसिएशन ऑफ होमिओपॅथिक फिजिशियन’ (IIHP) चे डॉक्टर डॉ शिव विठ्ठल, डॉ अवतार अनेता आणि डॉ कुलतार संधू  यांनी आमचे स्वागत केले. विशेष म्हणजे डॉ शिव विठ्ठल सरांची नागपूर च्या होमिओपॅथिक परिषद नंतर प्रदीर्घ  कालावधी नंतर भेट झाली. डॉ विठ्ठल सरांचे पंजाब मधील सर्वात मोठे 10 बेडचे सर्व सुविधा युक्त पहिले होमिओपॅथिक हॉस्पिटल पाहिले. बिकानेर स्वीट मार्टवर विविधमिठाई चाट’ वर ताव मारत त्यांच्या आदरातिथ्यचा आस्वाद घेतला. त्यांना आमच्या सायकल मोहिमविषयी सविस्तर माहिती दिली. क्लीनिक शाळेपासून सुट्टी घेऊन एड्स जनजागृती सारख्या सामाजिक विषयावर सायकलवर जनजागृती केल्याबद्दल सर्व डॉक्टर मंडळींनी आमचे कौतुक केले. त्यांचा निरोप घेऊनराजपुरा’ कडे मार्गस्थ झालो.
30
किमी राजपुरा बाकी होते सकाळपासून 90 किमी झाले होते. उन बरेच पडले होते पण cramp येऊ नये म्हणून ORS पीत ‘stretching’ करत, आरामात दुपारी 02:30 ला राजपुरा येथील गुरुद्वारा येथे पोहोचलो

तर पाहतो काय 80 वर्षीय गणित तज्ञमेजर घई’ सायकलवर आमचे स्वागत करण्यासाठी वाट पाहत होते. ‘प्रा घई’ म्हणजे कालबिधीपूर’ येथे पाहुणचार घेतलेल्याडॉ रश्मी’ यांचे वडील आणि पंजाबमधील प्रसिद्ध गणित तज्ञ आज ते या वयात सर्व काम सायकलवर करतात. त्यांनी आमचे पुष्पहार घालून स्वागत केले. आम्ही पण त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. इतकी मोठीहस्ती’ सोबत आज आमची भेट झाली त्याचा आनंद मानत आम्ही त्यांनी आणलेल्या जेवणावर अन्न देवतेचे आभार मानत सर्वे भवांतू सुखीनं आदी मंत्र म्हणून पोटभर जेवलो

जेवणानंतर त्यांच्या सोबत 'नौजवान आवो रे' गाणे म्हणताना सर्व शिन गेला.

गुरुद्वारा तील बाबाजींनी आम्हाला आशीर्वाद दिले. प्रा घई यांनी त्यांचे आत्मचरित्र देऊन आमचा सत्कार केला


पुढील लक्षअंबाला’ ठेवत आम्ही त्यांचा निरोप घेऊन निघालो.
अंबाला 20 किमी बाकी असताना रोड चे काम सुरू असल्याने ट्रॅफिक प्रचंड धूळ चा खूप त्रास होत होता. जवळपास 8 किमी धूळ, दगड, धोंडे चुकवत अखेर चांगला रस्ता लागला आणि आम्हीहरयाणा बॉर्डर चेक पोस्ट’ ला 150 किमी सायकलिंग नंतर प्रवेश केला.

 

दुपार पक्व होऊन संध्याकाळ झाली. राजपुरा सोडून बरेच पुढे आलो होतो. आता जवळपास 5:30 वाजत आले होते. आम्हीअंबाला चेक पोस्ट’ जवळ पोहोचलो. जसा सूर्य मावळला तसा पांढऱ्या रंगाचे ऊन सोनेरी रंगात बदलले, सोनेरीचे शेंदरी आणि आता शेंदरीचे गुलाबी. पुढील बदल पहायला आम्ही थांबू शकत नव्हतो कारणअंबाला’ शहरात आम्ही प्रवेश केला होता

 

वाटेत आम्हालाशेतकरी आंदोलन’ चे लंगर लागले. तेथील शेतकरी आंदोलकांशी भेट घेऊन पुढे टोल प्लाझा ओलांडून अंबाला शहरात प्रवेश केला. इथून पुढेमिलिटरी एरिया’ तुन मार्ग काढत अंबाला मेन मार्केट मध्ये पोहोचलो. इथे पुन्हा सायकल वरील बोर्ड वाचून अनेक अंबालातील नागरिककहां से आये हो ? इतने दूर की साईकिल यात्रा क्यो कर रहे हो ?रास्ते मे रोटी खाये क्या ? चाय तो पिके जावो’ आदी प्रश्न विचारत होते शिवाय चहा साठी आग्रह करत होते.
‘अंबाला’ म्हणजे पंजाब ओलांडल्यावर हरयाणा मधील पहिलेच शहर. इथून चंदीगड केवळ 30 -35 किमी आणि मिलिटरी आणि एअर फोर्स चे फार मोठे तळ. शिवाय इंग्रजांच्या काळ पासून इथे फार मोठी छावणी राहिली आहे. आमचा रात्रीचा मुक्कामडॉ हरप्रकाश शर्मा’ यांच्या घरी होता त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या होमिओपॅथिक क्लीनिक मध्ये आमचे स्वागत केले. त्यांच्या मुलाने त्या भागातील चीज सँडविच हॉट कॉफी ने आमचे स्वागत केले. ‘डॉ हरप्रकाश शर्मा’ - हरयाणा होमिओपॅथी बोर्डचे सल्लागार सदस्य शिवाय होमिओपॅथी क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व जवळपास 40 वर्षा पासून तेहोमिओपॅथी’ उपचाराद्वारे हजारो रुग्णांची त्यांनी सेवा केली आहे. त्यांच्या घरी त्यांच्या पत्नी ने अत्यंत सात्विक रुचकर जेवण वाढून आमचे आदरातिथ्य केले. त्यांच्या घरी होमिओपॅथी चे जनक डॉ सॅम्युएल हानीमन यांचा पुतळा स्थापन केला आहे. त्यास अभिवादन करून आमच्या मोहीम सामाजिक कार्य विषयी कुटुंबातील व्यक्ती त्या भागातील नागरिकांशी संवाद साधला. अखेर उशीर झाल्याने दिवसभराच्या 165 किमी सायकलिंग मुळे थकल्याने झोपी गेलो.