Monday, November 13, 2017

२९ ऑक्टोबर 2017 गुरुवायूर कोची चेरथला




29 ऑक्टोबर रोजी सकाळी उठायला थोडा उशीर झाला. गर्दी असल्याने गुरुवायुर विष्णू मंदिराचे बाहेरून दर्शन घेतले. माझ्या दोन्ही मुलींसाठी केरळ ट्रॅडिशनल फ्रॉक विकत घेतले. निघेपर्यंत 7:30 वाजलेआता इथून पुढचा प्रवास केवळ मला आणि डॉ संदीप लाच करायचा होता. मागच्या दोन्ही सायकल मोहिमेचा अनुभव असल्याने आमच्या दोघात व्यवस्थित सुसूत्रपणा होतादोघे एका मागे एक असे पेडलिंग करत हायवेला लागल्यावर 10 किमी सायकलिंग नंतर नाष्टयाच्या ब्रेक घेतला.नाश्ता करून कोडूनगलूर रस्त्याला लागलो.हा तसा राष्ट्रीय महामार्ग वाटेत सुंदर असे रामाचे मंदिर होते. 11 वाजता कोंडंगलूर पोहोचलो.येथे प्राचीन माँ भगवती देवीचे मंदिर आहे. आम्मे शरणम चा जयघोष करत हजारो भाविक देवीचे दर्शन घेतात. मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी लुंगी घालणे आवश्यक आहे.
आम्ही दोघांनी दर्शन घेऊन मंदिर परिसरातील भाविकांना एड्स जनजागृती पत्रकाचे वाटप केले.
पुढे हायवेला लागलो. सेलम कन्याकुमारी हायवे अत्यंत हेवी ट्रॅफिक असलेला रस्ता जिथे सायकल चालवणे अवघड. सोबत समुद्र जवळ असल्याने प्रचंड ह्यूमीडिटी जाणवत होती. पुढे एका दुकानावरून टॅंग विकत घेऊन 1 लिटर तयार केले. टॅंग मुले एनर्जी आली. गर्मी असली तरी रूट छान होता. आम्ही दोघे पूल आला कि मस्त फुटपाथ वरून सायकल चालवत मस्त फोटोसेशन, व्हिडियो करणे, सेल्फी वगैरे. रस्त्यात वरपुझा ब्रिज लागले. नदीच्या किनारी एक छान फिशनेट, आसपासची सुंदर हिरवळ कि जसे या हिरवळी चे प्रतिबिंब पाण्यात पडून पाणी हिरवे झळकत होते. वरपुझा पूल ओलांडून एर्नाकुलम शहरात प्रवेश केला. दुपारचे दीड वाजले होते शिवाय भूक हि लागली होती. गर्मी आणि मागील 4 दिवसापासूनच्या सततच्या सायकलिंग मुळे सॅडल सोअरनेस आले होते. नीट सीटवर बसता येत नव्हते. भूक लागली होती. मी आणि संदीप ने कोचीन स्पेशल बिर्याणी आणि दही, कोशिंबीर खाल्ली.
पुढे डॉ मोहम्मद सलिह आयएचएमए कोचीन च्या सहकाऱ्यांनी आमचे स्वागत केले. त्यांना जनजागृती पत्रकांचे वाटप केले. दोघांना त्यांनी मधुर अश्या शहाळाचे पाणी पाजले. पुढे डिकॅथलॉन मॉल वरून फोमचे सीट कव्हर घेतले.तेथे अनेक सायकलिस्टशी भेट झाली. ते देखील बॅक वॉटर राईड साठी जात होते. त्यांना आमच्या मोहिमेविषयी माहिती देऊन पत्रके वाटली. त्यांनी आमच्या वॉटर बॉटल रिफिल करून दिल्या. पुढे आल्लेपी हायवेला लागलो. वाटेत कोची युनिव्हर्सिटी ऑफ फिशरीज ऍण्ड ओशियन स्टडीज ला भेट दिली.
पुढे एक मोठा ब्रिज लागला. आम्ही दोघे मस्त ब्रिजवर व्हिडियो घेत होतो. फुटपाथवर सायकल चालवण्याने वाहतुकीची भीती नव्हती. चेरथला केवळ 30 किमी बाकी होते. भरपूर पाणी पिऊन देखील गर्मी मुळे लघवीला थोडा त्रास होता. म्हणून लिक्विड ओआरएस घेतले. 20 किमी बाकी असतांना कॉफी मागवली सोबत घरून आणलेल्या चिक्की. आता केवळ 11 किमी बाकी होते. रेल्वे क्रॉसिंग ओलांडून कोस्टल रूट घेतला. दोन्ही बाजूला छान घरे आणि अत्यंत तुरळक ट्रॅफिक. सायंकाळ झाली होती. पण डेस्टिनेशन जवळ असल्याने आम्हाला घाई नव्हती. शेवटी दिवसभरात 125 किमी सायकलिंग करून सायंकाळी 6 वाजता कणिचूकुलांगरा मंदिर, चेरथला पोहोचलो. मंदिर दिपोत्सवाने छान सजले होते. डॉ शिबा राणी मॅडम ला आम्ही पोहोचल्याचा कॉल करून ते येई पर्यन्त मस्त तास भर मंदिरातील दीपोत्सव पालखी मिरवणूक चा आनंद घेतला. तेथील उपस्थित भक्तांना जनजागृती पत्रकांचे वाटप केले. चेरथला येथे कणिचूकुलांगरा देवी चे प्राचीन मंदिर आहे. तेथिल देवस्थान च्या भक्त निवास मध्ये आमच्या राहण्याची सोय केली होती. सायंकाळी डॉ शिबा राणी मॅडम त्यांचे पती यांनी खूप छान आदरतिथ्याने स्वागत करून पोटभर जेऊ घातले. संदीप ने तर विविध नॉन व्हेज डिश टेस्ट केल्या. रात्री वेळेवर झोपलो.





















No comments: