दिवस तिसरा: पंढरपूर कुर्डुवाडी ६० किमी
१५ जुलै ला सकाळी आरामात उठून सर्व मुलांशी मस्त गप्पा मारल्या. फ्रेश होऊन चहा घेऊन त्यांचा सर्वांचानिरोप घेतला पुढच्या वारीत लवकरच भेटण्याचा शब्द देऊन निघालो.विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात आमचा सायकलवारीला बोर्ड पाहून अनेक लोकांच्या प्रश्नाचे उत्तरे देत छान जनजागृती झाली। तिथे नाशिक, मंगळवेढा हुन आलेले अनेक सायकल वारकरी भेटले. सायकल वारकरी म्हणजे आमचं खास म्हणायचं त्यांच्याशी प्रवासा विषयी बोलत मुख दर्शनाच्या लाईन ला लागलो. तेथे परभणीतील अनेक वारकरी मित्र भेटले. पुढे भक्त पुंडलिकाच्या मंदिराचे दर्शन घेऊन निघावे म्हणतो तर तितक्यात डिंपल ताईंचा फोन मग नाश्ता ला जावे लागले.
पुढे भक्त पुंडलिकाच्या मंदिराचे दर्शन घेऊन निघावे म्हणतो तर तितक्यात डिंपल ताईंचा फोन मग नाश्ता ला जावे लागले. डिंपल ताई आणि तिची वाहिनी दोघाणे प्रेमाने आदरातिथ्य केले. पालवीतील मुलांनी तयार केलेल्या रुमाल विकत घेऊन पुढच्या वर्षी निवांत येण्याचे आश्वासन देऊन निरोप घेतला. आता पंढरपूर कुर्डुवाडी 60 किमी अंतर बाकी होते. चांद्रभागेवरील पूल ओलांडून शेतफळ च्या दिशेने पेडलिंग करत निघालो. रस्ता खाली वर होता सोबत उन्हाचा त्रास आणि खूप खराब शिवाय ठिकठिकाणी सिमेंट रोड चे काम चालू असल्याने सायकल चालवताना मनगटाला मुंग्या येत होत्या. थोडी स्ट्रेचिंग करून पाणी पिऊन ग्लोव्हज घातले. आरामात पेडलिंग करत 32 किमी नंतर शेतफळ पोहोचलो. आता केवळ 22 किमी बाकी बॉटल मध्ये ओआरएस भरून घेतले. वाटेत काही पालखी आणि वारकरी भेटत होते.आमच्या सायकल वारी बद्दल विचारत होते. पुढील रस्ता खडबड व माळरान चा असल्याने चढ उतार होता. वाटेत पावसाने गाठले आम्ही देखील मस्त भिजत आरामत कुर्डुवाडी स्टेशन पोहोचलो. आम्ही अत्यंत आनंदी होती की केवळ 2 दिवस साडे तीन तासात ही 345 किमी सायकलवारी पूर्ण केली. पार्सल ऑफिस मध्ये सायकल बुक करायला गेलो तर रविवार सांगून नकार मग एलटीटी अर्थात लगेज ट्रॅव्हल तिकीट म्हणून घ्या विनंती केली तर हॉलिडे ट्रेन आहे म्हणून पुन्हा नकार. शेवटी विनवणी केल्यावर 5 वाजता या म्हणून हाकलून लावले. आम्ही कंटाळून जेवायला गेलो तर सहज इंदापूर चे कैलास कदम सरांना फोन लावला काही मदत मिळतील का ? म्हणून त्यांनी लगेच प्रतिसाद देत कुर्डुवाडी पोलीस स्टेशनच्या आरिफ सरांनी संबंधित पार्सल ऑफिसर ला कळवले आणि लगेच आम्हाला सायकल बुकिंग च्या फॉर्मलिटी चा निरोप मिळाला. अखेर 5 वाजता सायकल बुक करून ट्रेन मध्ये चढलो. शेवट पांडुरंगाच्या आशीर्वादाने गोड झाला कोणत्याही कटू आठवणी किंवा अनुभव मनात न येता. विशेषतः आकाश गीते ची मोलाची लागलेली साथ.

2 comments:
सर, खूप सुंदर लिहिलंय!! आपलं काम खूप मोठं आहे!!! खूप खूप अभिनंदन.
Beautiful an inspiring sir 👍
Post a Comment