दिवस दुसरा: चौफुला भिगवण इंदापूर पंढरपूर १६५ किमी
१४ जुलै ला सकाळी 5 वाजता उठून 05:50 ला निघालो. भिगवण येथील ग्रुप आम्हाला न्यायला खडकी येथे येणार होता. रस्ता चढ उतार रोलिंग होता. त्यामुळे वारंवार गियर बदलत सायकल चालवत होतो. पाटस नंतर मळद पासून रस्त्याच्या उजव्या बाजूच्या सर्व्हिस रोड ने 2 किमी आलो असेल तेथे भिगवण सायकलिंग क्लब आमच्या स्वागतास सज्ज होता. त्या सर्वांनी आमचे स्वागत केले. मागच्या वर्षीच्या पंढरपूर सायकल वारी दरम्यान सायकलिंग साठी मी केलेले आवाहन त्यांनी इतके मनावर घेतले की आज भिगवण येथे सायकलींग ग्रुप तयार होऊन ते रोज 25-30 किमी सायकलिंग करतात. त्यांच्या सोबत भिगवण येथे पोहोचून आम्ही 10 झाडे लावली. भिगवण सायकलिंग क्लब व नेचर क्लब भिगवण व रोटरी क्लब भिगवण च्या सदस्तासोबत मस्त मिसळ पाव चा आस्वाद घेत सर्वांशी सध्या एचआयव्ही बाधित बालकांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या कार्याबद्दल संवाद साधला. लगेच आम्हास इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ च्या कला महाविद्यालय येथे कार्यक्रम असल्याचे कळाले. प्रा प्रशांत चवरे जे तेथील प्राध्यापक व दै सकाळ चे बातमीदार त्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता. या प्रसंगी डॉ. जयप्रकाश खरड, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रियाज शेख, प्राचार्य भास्कर गटकुळ, प्रा. पद्ममाकर गाडेकर उपस्थित होते. मी विद्यार्थांना म्हणालो "आषाढी वारीच्या माध्यमातून संतानी समाजातील अनिष्ठ प्रथा, अंधश्रध्दाविषयी प्रबोधन केले. सध्या एचआयव्ही एडस् रोगामुळे व एचआयव्ही एड्स बाधितांना समाजाकडुन मिळणाऱ्या दुय्यम अथवा हीनदर्जाच्या वागणुक यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. या अत्यंत ज्वलंत विषयावर वारीच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे यासाठी आळंदी ते पंढरपुर सायकलवारीच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करत आहे. समाजाने एडसग्रस्तांना मानवतेची वागणुक द्यावी असे आवाहन करतो". पुढे डॉ जयप्रकाश खरड यांच्या गच्चीवरील बागेला भेट दिली. त्यांनी या बागेत सेंद्रीय भाजीपाला, विविध फुले, कमळ फुलवले आहेत. वेळेची मर्यादा असल्याने सर्वांचा निरोप घेऊन निघालो. भिगवण पळसदेव इंदापूर रस्ता चढ उताराचा होता आणि सोबत ऊन तापल्याने घामाच्या धारा वाहत होत्या. पळसदेव ला ओआरएस तयार करून घोट घोट घेत एक एक चढ व्यवस्थित गियर बदलत पार केले. इंदापूर च्या वेशी जवळ कैलास कदम सरांचा फोन आला. ते सर्व वाट पाहत होते. कैलास कदम हे इंदापूर नगरपरिषद येथे नगरसेवक व काँग्रेस चे गटनेते शिवाय डॉ जयप्रकाश खरड यांना गुरुस्थानी मानतात. काँग्रेस भवन इंदापूर येथे त्यांनी आम्हा दोघांना खास फेटे बांधून स्वागत केले. या कार्यक्रमास इंदापूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष भरत शहा इंदापूर चे नगरसेवक, काँग्रेस चे पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. माझ्या मनोगतात मी सेवालय प्रकल्प येथे संस्थापक रवी बापटले सर यांचे सुरू असलेले कार्य व त्यां मुलांना एचएआरसी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य, जनसामन्यांत एड्स विषयी जनजागृती साठी सायकल प्रवास, 18 वर्षा वरील विद्यार्थ्यांचा रोजगार चा प्रश्न व चांगले आरोग्य तंदुरुस्ती व प्रदूषण मुक्त पर्यावरण साठी कोणतीही बॅक अप व्हेहिकल न ठेवता सुरू असलेला सायकल प्रवास विषयी संवाद साधला. कार्यक्रम नंतर दै सकाळ चे पत्रकार सागर शिंदे यांनी माझी मुलाखत घेतली. पुढे फळांचा अल्पोपहार घेऊन अकलूज कडे निघालो. आता खरी परीक्षा होती अकलूज 30 किमी आणि वेळापूर 41 किमी। मुक्काम वेळापूर ला करू असे ठरवले होते. इंदापूर अकलूज वेळापूर दरम्यान उलट्या वाऱ्याचा अर्थात हेड विंड चा त्रास सोबत उन्हाचा त्रास होत होता. आम्ही पहिला ब्रेक 12 किमीवर सुरवड येथे घेऊन थोडी केळी, ओआरएस पिऊन स्ट्रेचिंग करून निघालो. या रोडवर ठिकठिकानी वारी संदर्भात छान सुविचार लिहिले होते शिवाय दुतर्फा झाडे असल्याने हायवे पेक्षा बरे वाटत होते. वाटेत 1 मोठी पालखी लागली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम चा जयघोष करत वारकर्यांना नमस्कार करत निघालो. पुढे बावडा गाव लागले तेथील काही लोकांनी बोर्ड पाहून विचारपूस केली आणि आम्ही देखील आवडीने उत्तरे दिली. उन्हामुळे त्रास होत होता परंतु जनजागृती कार्य महत्वाचे असल्याने चिडचिड न होता लोकांशी संवाद साधण्यात आनंद मिळत होता. पुढे नीरा नदीच्या पुलावर आलो तर पाहतोय काय मागील वर्षी पेक्षा पाणी कमी दिसत होते. पुण्यात पाऊस भरपूर होता पण सोलापूर त्या मानाने कोरडा वाटला. पेडलिंग करत अकलूज पोहोचलो मस्त एक गुजराती गाड्यावर बदाम शेक पिले. बदाम शेक माझे आवडते पेय शिवाय हाय कॅलरी व एनर्जी देणारे ड्रिंक हवे होते सोबत तितकाच अर्धा तास आराम मिळाला. पुढे 11 किमी नंतर वेळापूर सहज गाठले. माझा श्रमसंस्कार छावणीतील मित्र ह.भ.प. स्वामीराज भिसे याच्या कुटुंबीयांनी आमचे स्वागत केले. त्याच्या संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायाशी निगडित, ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीत अनेक वर्षांपासून सेवा करणारे कुटुंब व त्याचे वडील पत्रकार सूर्यकांत भिसे यांचा पालखीत विशेष मान असतो. दोन्ही भाऊ मराठी चित्रपट व नाट्यक्षेत्रात प्रसिद्ध कलावंत तर स्वामीराज हा पत्रकार असून दिंडीत स्वच्छता व प्रबोधनाचे कार्य शिवाय कीर्तन व आध्यत्मिक विषयावर व्याख्यान देखील देतो. त्याच्या घरी फ्रेश होऊन मस्त पोहे, चहा घेतला. सायंकाळचे 5 वाजले होते व पंढरपूर पर्यंतचे केवळ 33 किमी अंतर बाकी असल्याने वेळापुर येथील मुक्काम टाळून सर्वांचा निरोप घेऊन आमची चाके चालली पंढरपूर च्या दिशेने. वाटेत एक पोरगा "ओ मामा गियर टाका ना" म्हणत वेगाने सायकल आमच्या पुढे नेऊन म्हणाला "बघा मी गियर च्या सायकलला मागे टाकले". आम्ही देखील त्या निरागस चिमुकल्याच्या यशास दाद देत त्यास शाबासकी दिली. थोडा उतार चढ असल्याने आम्ही अत्यंत उत्साहाने पेडलिंग करत तोंडाळे मार्गे भांडीशेगाव येथे पोहोचलो. भंडीशेगाव येथील बाजार प्रसिद्ध आहे. थोडी स्ट्रेचिंग करून पाणी पिऊन निघालो. आता केवळ 15 -20 किमी अंतर बाकी होते. आता आम्हाला 'भेटी लागी जीवा लागलीशी आस' प्रमाणे केंव्हा पंढरपूर पोहोचतो याची ओढ लागली होती. सायंकाळी 7 वाजता दिवसभरातील 162 किमी आणि मागील 2 दिवसातील 275 किमी सायकलिंग करून पंढरपूर च्या चौकात पोहोचलो. पुढे एक रस्ता मंदिर कडे तर दुसरा रस्ता 5 किमीवर आमचया विठ्ठलाकडे अर्थात पालवी एड्स मुलांचे पुनर्वसन केंद्र येथे जातो. जवळील सुपर शॉपिवरून मुलांसाठी 7 किलो पेंड खजूर घेतले तर तितक्यात जोरात पाऊस सुरू झाला. बाजुच्या हॉटेल वरून पिशवी मागून आम्ही पालवी कडे निघालो तर 5 किमी मध्ये पाऊस आणि उलटा वारा आम्हाला रोखू पाहत होता. पण आमचा दृढ निश्चय असल्याने आम्ही सायंकाळी 07:40 ला पालवी प्रकल्पला पोहोचलो. तेथील विद्यार्थांनी आम्हाला ओवाळून औक्षण केले। त्यांचे स्वागत पाहून आमचा थकवाच लगेच निघून गेला. मंगल ताई शहा या पालवी प्रकल्प च्या संस्थापक व 115 एचआयव्ही बाधित अनाथ बालकांचा सांभाळ करतात. आता त्यांची मुलगी डिंपल गाडगे आणि राजकुमार गाडगे हे हा प्रकल्प तितक्याच समर्थपणे चालवत आहेत. आम्ही फ्रेश होऊन जेवायला बसलो तितक्यात मंगल ताई खास आमच्यासाठी दाल बाटी आणि चुरमा घेऊन आल्या. मस्त दाल बाटी चुरमा आणि सोबत मेतकूट चा आस्वाद घेत पोटभर जेवलो. जेवणानंतर ताई सोबत या मुलांचे विविध प्रश्न विशेषतः 18 वर्ष पूर्ण झाल्यावर रोजगाराचा प्रश्न यावर चर्चा तसेच या मुलांना चांगले संस्कार व्हावेत म्हणून मंगल ताईंनी विविध पुस्तक, लेख त्याची कात्रणे, भित्तीपत्रके, विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने, पालकत्व आदी विषयावरील कार्याबद्दल सांगितले. खरच मंगल ताईंचे या मुलांसाठी नवनविन उपक्रम स्तुत्य आहेत. आम्ही मुलांसाठी आणलेला खाऊ अर्थात पेंड खजूर व काही आर्थिक मदत ताई कडे सुपूर्द करून खऱ्या अर्थाने वारीचा समारोप केला. थकल्याने लगेच झोप लागली.

No comments:
Post a Comment